जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:38 PM2019-01-02T22:38:54+5:302019-01-02T22:39:28+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओमधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील २१ लाभार्थ्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली. स्वत:चे हक्काचे घर मिळाल्याबद्दल जनतेमध्ये या योजनेबद्दल प्रचंड आपुलकी दिसून आलीे.

Interaction with the Chief Ministers by the beneficiaries of the district | जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील २१ लाभार्थी : विविध विषयांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओमधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील २१ लाभार्थ्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली. स्वत:चे हक्काचे घर मिळाल्याबद्दल जनतेमध्ये या योजनेबद्दल प्रचंड आपुलकी दिसून आलीे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर क्षेत्रातील महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी तसेच राजुरा व वरोरा नगरपालिकेच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा यात सहभाग होता. तसेच योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच शबरी आवास योजना व रमाई आवास योजना यालाही उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या सर्व लाभार्थ्यांनी महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्ये या योजनेला मिळालेल्या लाभाच्या यशकथा ऐकता आल्या. मुख्यमंत्र्यांनी दोन तासांच्या अवधीमध्ये १० जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांसोबत यावेळी चर्चा केली. वेळेच्या कमतरतेमुळे अनेक जिल्हयांसोबत त्यांची चर्चा होऊ शकली नाही. तथापि, या योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व लाभार्थ्यांचे आभार मानले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल घेतलेल्या पुढाकाराने अनेकांना आपल्या हक्काचे घर मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले असल्याचे यावेळी लाभार्थ्यांसोबतच्या चर्चेत पुढे आले. प्रत्येकाची घर मिळण्याची स्वतंत्र कहाणी होती. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी काही भेट वस्तूसुद्धा आणल्या होत्या. तत्पूर्वी आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. लाभार्थ्यांना या योजनेसंदर्भात कुठलीही अडचण असल्याबाबत विचारणा केली. लाभार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमानंतर त्यांना सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
हे होते लाभार्थी
या लोकसंवादमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची नावे सुशिला रामभाऊ झाडे, ताई गुलाब कार्लेकर, करिमाबी अब्दुल जलील कुरेशी, रजनी संजय बारस्कर, नंदा शंकर जुमडे, गजानन आकनूरवार, चक्रधर उपासे, भिमराव माटे, नामदेव शेंडे, अनिल सतीमेश्राम, सरिता जतीन आकनूरवार, शितल कोंडू नरड, संगिता अनिल भटारकर, जमुना जीवनदास उपरे, कविता कवडू पचारे, किशोर निमगडे, छाया श्रीनिवास निमगडे, प्रशांत सुखदेवे, मनोहर मेश्राम, चरित्र चौधरी व अरविंद परचाके यांनी सहभाग घेतला होता. लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Web Title: Interaction with the Chief Ministers by the beneficiaries of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.