आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

By राजेश भोजेकर | Published: December 6, 2023 07:11 PM2023-12-06T19:11:52+5:302023-12-06T19:13:47+5:30

पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी संकल्प : जगविख्यात तज्ञांसह आढावा बैठक

international standard tiger safari project will be done at chandrapur | आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

चंद्रपूर : विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख शैलेंद्र  टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वनविकास महामंडळाचे सिजिएम संजीवकुमार, प्रशांत झुरमुरे, कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांना दाखविण्यात आले.

चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनी जवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प व्हावा असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न व्हावा;अश्या प्रकल्पातून संशोधन व्हावे अशीदेखील अपेक्षा यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ना. मुनगंटीवार म्हणाले कि, सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहीती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा अशा सूचना यावेळी दिल्या.

Web Title: international standard tiger safari project will be done at chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.