मराठी शाळा मोडकळीस आणण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:50+5:302021-09-25T04:29:50+5:30
चंद्रपूर : राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनिधी मागील दहा वर्षांपासून नसल्याने शिक्षकांच्या अनेक समस्या निर्माण ...
चंद्रपूर : राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनिधी मागील दहा वर्षांपासून नसल्याने शिक्षकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, वेतन सातत्याने उशिरा होणे, विनाअनुदानित शाळांना अनुदान, जुनी पेन्शन योजना आदी समस्या आहेत. भविष्यात मराठी शाळा मोडकळीस आणण्याचा कुटील डाव सरकारचा आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी एकसंघ होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे मत सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ राजुरा यांच्या वतीने आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष ताजने, उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळ, मुंबईचे सहकार्यवाह जगदीश जुनघरी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्राचार्य डॉ. संभाजी वरकड यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, प्राचार्य सुधाकर उईके, देवराव निब्रड, दीपक धोपटे, मसुद अहमद, मुख्याध्यापिका छाया मोहितकर, इंदिरा येवले, मुख्याध्यापक सुधाकर उईके, के. टी. डांगे, मोरेश्वर थिपे, आनंदराव मत्ते, प्रभाकर बोबाटे, बोबडे ,जांभुळकर, प्रभाकर उईके, भास्कर ठावरी, नाना डाखरे, पर्यवेक्षक वसंत पोटे, राजू डाहुले, आनंद चलाख यांची उपस्थिती होती.
संचालन सुभाष शेंडे, प्रास्ताविक राजू डाहुले, आभार आनंद चलाख यांनी मानले.