Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:03 PM2019-04-05T18:03:46+5:302019-04-05T18:06:33+5:30
मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींनी अदानीला ६ विमानतळ दिले. या मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदार केली आहे, असे घणाघाती आरोप करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसला निवडून देण्याचे व स्थिर सरकार आणण्याचे आवाहन येथील मतदारांना केले.
देशात पैशाची कमी नाही. जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी आणि मजुरांना देण्यासाठी पैशाची कमी आहे पण अंबानींसाठी ती कमी नाही. गरीबांना देत नसाल तर मग उद्योगपतींनाही पैसे देऊ नका. मेक इन इंडिया म्हटले पण देशात व्यापार ठप्प झाला आहे. सगळा चायना माल येथे येतो आहे. नोटबंदीला १२ वर्षांच्या मुलानेही नकार दिला असता. पण ती गोष्ट मोदींना कळली नाही. महागाई वाढते आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही निवडणुकांनंतर ट्रॅक्स प्रणाली सरळ करू. शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करू असे आश्वासन राहूल गांधी यांनी यावेळी दिले.
आम्हाला कितीही विरोध झाला तरी ७२ हजार आम्ही देणारच. ही विचारधारेची लढाई आहे. मोदी नेहमी सगळ््यांची निंदा करतात. द्वेषाचे राजकारण करतात. लोकांमध्ये दरी निर्माण करतात. काँग्रेस नेहमी समता, न्याय व प्रेम यावर बोलते. २०१९ मध्ये या आमच्या विचारधारेचा विजय होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.