ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत जनतेच्या सेवेत रुजू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:23+5:302021-07-10T04:20:23+5:30

राजुरा : भाजप सरकारच्या कार्यकाळात माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या पुढाकाराने ग्रामीण ...

Introduce the new building of the rural hospital to the public service | ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत जनतेच्या सेवेत रुजू करा

ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत जनतेच्या सेवेत रुजू करा

googlenewsNext

राजुरा : भाजप सरकारच्या कार्यकाळात माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकाम करण्याकरिता मंजुरी मिळाली होती. इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले होते. परंतु इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून ती इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे.

विरुर स्टेशन हे राजुरा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून तेलंगणा सीमेवरील लगत असलेले गाव असून परिसरात अनेक गावाचा विरुर स्टेशन या गावाशी संपर्क येतो, या गावात मोठी बाजारपेठसुध्दा आहे, विरुर स्टेशन तसेच परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी लक्षात घेता राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार ॲड. संजय धोटे यांनी ही बाब माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली व राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला मंजुरी मिळवून दिली. त्यापैकी विरुर स्टेशन येथील इमारत पूर्णत्वास आली. कोरोना महामारीत होणारी रुग्णाची गैरसोय तसेच परिसरातील लोकांना आरोग्यविषयी होणारी अडचण लक्षात घेता, ही इमारत लवकरच जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी धोटे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी इमारतीची पाहणीही केली. याप्रसंगी सतीश कोमरपल्लीवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपचे शहर अध्यक्ष भीमराव पाला, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, श्रीनिवास ईलदुला, मोतीराम दोबला आदी उपस्थित होते.

Web Title: Introduce the new building of the rural hospital to the public service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.