ज्ञानवर्धक प्रयोगातून आधुनिक शेतीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:49 PM2019-01-14T22:49:44+5:302019-01-14T22:50:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्याची कृषी संस्कृती समजून घेण्यासाठी विविध मॉडेल, त्यातील वर्गीकरण, दुधाळू जनावरे, कृषी शिक्षण, यांत्रिकी, ...

Introducing modern farming through enlightening experiments | ज्ञानवर्धक प्रयोगातून आधुनिक शेतीला चालना

ज्ञानवर्धक प्रयोगातून आधुनिक शेतीला चालना

Next
ठळक मुद्देकृषी प्रदर्शन : प्रदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याची कृषी संस्कृती समजून घेण्यासाठी विविध मॉडेल, त्यातील वर्गीकरण, दुधाळू जनावरे, कृषी शिक्षण, यांत्रिकी, मार्केटिंगपासून तर पॅकेजिंगपर्यंतची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे पाहण्याची संधी कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मिळाली. यातून आधुनिक शेतीला चालना मिळू शकते, असा आशावा जागरूक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाच्या वतने चांदा क्लबवर कृषी प्रदर्शन व सरस महोत्सव रविवारी पार पडले. यावेळी कृषी क्षेत्रातील विविध विषयांची पथनाट्यातून सादर करण्यात आले. सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण देशपांडे यांनी सोयाबिन, धान, कपाशी या पिकांची माहिती दिली. बियाणे सलग तिन वर्षे वापरून शेतीवरील खर्च कमी कसे करता येते, हे विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. सकस चारानिर्मितीतून पशुधन समृद्धी व चारा साठवणुकीच्या आणि चारा गुणवत्तावृद्धी विविध प्रकिया या विषयावर उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. राजेंद्र देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन हा केवळ जोडव्यवसाय आहे याकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. शेतीला पशुसंवर्धनाची जोड आवश्यक आहे. ज्वारी काढल्यानंतर शिल्लक राहणारा कडबा, सोयाबिन काढल्यानंतर राहणारा कुटार, धानाचा तणीस चारा आदींची उपयोगिता शेतकºयांना समजावून सांगण्यात आली. उत्पादनक्षम पशुला चारा जास्त प्रमाणात लागत असतो. जनावरांना चारा देताना त्यामध्ये प्रथिने, कॉबोहायड्रेटचे प्रमाण कसे वाढवावे, यासंदर्भातील माहिती उपयुक्त ठरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दूधाळी जनांवराना ढेप देण्यापेक्षा जनावरांना हिरवा चारा द्यावा. चारा पीक घेताना मूबलक पाणी, जमीन, जमीन गुतंवणूक व जनावरांची संख्या याचा मेळ घालूनच चाºयाचे पीक घ्यावे, यावर कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बचतगटांनी तयार केलेल्या महिलांच्या वस्तुंना सरस विक्री प्रदर्शनीमध्ये ग्राहकांकडून मोठी मागणी होती. विक्रीतून ५ लाख ९० हजार रूपये मिळाल्याची महिलांनी दिली. नागभिड तालुक्यातील झेप संघाने तयार केलेल्या अग्निशस्त्र, ब्रह्मस्त्र, जिवामृत, घणअमृत, अडांलिंबू आदींचा विषमुक्त शेतीसाठी उपयोग होणार आहे. वैभव लक्ष्मी महिला बचतगटाच्या सदस्यांनी मातीच्या पारंपरिक भांडी तयार करून विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले होते.
बचतगटांकडून कृषिपूरक वस्तुंची निर्मिती
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध विषयांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याने शेतकऱ्यांचा आशावाद वाढला. नागभीड तालुक्यातील चिंधीचक वैष्णवी स्वयंसहायता बचतगटाने हातसडीचे सुवासिक तांदूळ प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते. नागभिड तालुक्याने कृषीपुरत वस्तुंची विक्रमी विक्री केली. ग्रामीण भागातील महिला प्रामुख्याने शेतीशी संबंधित आहेत. स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यांनी आता शेतीला आवश्यक असणाºया वस्तुंची निर्मिती करण्यास पुढे सरसावल्या. रासायनिक खतांचा कमी वापर करून विषमुक्त धान्य पिकविणे, त्यासाठी मार्केटींगची व्यवस्था करणे आदी समस्यांवर मार्गदर्शन केल्यास महिला बचतगट कृषी क्षेत्राला तारक ठरू शकतात.

Web Title: Introducing modern farming through enlightening experiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.