उपवर-वधू व पालक परिचय मेळावा

By Admin | Published: January 14, 2017 12:45 AM2017-01-14T00:45:50+5:302017-01-14T00:45:50+5:30

महाराष्ट्र विश्कर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघ अंतर्गत मयात्मज सुतार (झाडे) समाज, चंद्रपूर व सुतार समाज मेळावा आयोजन ...

Introducing Upon-Bride and Parent Introduction | उपवर-वधू व पालक परिचय मेळावा

उपवर-वधू व पालक परिचय मेळावा

googlenewsNext

सुतार समाजाचे आयोजन : गुणवंत विद्यार्थी व समाजातील कार्यकर्त्यांचा सत्कार
चंद्रपूर : महाराष्ट्र विश्कर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघ अंतर्गत मयात्मज सुतार (झाडे) समाज, चंद्रपूर व सुतार समाज मेळावा आयोजन कृती समितीच्या विद्यमाने सुतार समाजाचा २९ वा द्विदिवसीय राज्यस्तरीय उपवर-वधू पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे मंगळवारला पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाचे माजी कार्याध्यक्ष किशोर शास्त्रकार, यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष गरवारे पॉलिस्टर लिमिटेड औरंगाबादचे अध्यक्ष डॉ.विहार राखुंडे, प्रमुख पाहुणे स्थापत्य अभियंता सहायक नरेंद्र वनकर, महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष प्रदीप जानवे, आयोजन कृती समितीचे अध्यक्ष दत्ता ढवळे व महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती.
यावेळी, समाजातील कार्यकर्ते बबनराव राखुंडे , पंजाबराव उर्फ बाबाराव दुधलकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यापूर्वी मेळावे आयोजन केलेल्या माजी अध्यक्षांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप जानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दत्ता ढवळे यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या मेळाव्यात उपवर-वधूंनी पालकांसोबत मंचावर येवून परिचय करून दिला. संचालन प्रमोद माणुसमारे, मोरेश्वर वनकर, अल्का शास्त्रकार, ज्योती राखुडे, माधुरी शास्त्रकार यांनी केले. यावेळी ३०० उपवर-वधूंनी आपला परिचय दिला.
यावेळी समाजातील गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रभाकर नवघरे यांनी केले. यशस्वीतेसाठी दत्ता ढवळे, प्रभाकर नवघरे, मारोतराव परसुटकर, सतीश माणुसरमारे, सुभाष बुरडकर, अमित माणुसमारे आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Introducing Upon-Bride and Parent Introduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.