नागभीड येथे आज कुणबी समाजाचा परिचय मेळावा
By admin | Published: January 10, 2016 01:19 AM2016-01-10T01:19:30+5:302016-01-10T01:19:30+5:30
कुणबी समाजातील पोटजातीला एकाच विचारपीठावर आणुन प्रबोधनातून समाज जागृती व परिवर्तन करण्याच्या हेतूने रविवारी १० जानेवारीला येथे ...
नागभीड : कुणबी समाजातील पोटजातीला एकाच विचारपीठावर आणुन प्रबोधनातून समाज जागृती व परिवर्तन करण्याच्या हेतूने रविवारी १० जानेवारीला येथे अखिल कुणबी उपवर युवती व परिचय व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील रूक्मीणी सभागृहामध्ये दुपारी १२ वाजता हा मेळावा पार पडेल. याच कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते समाजाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत जैमिनी कडू, यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूषी राऊत राहतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक वामनराव चटप उपस्थित राहतील. कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे, पं.स.सभापती रेखा जगनाडे, पं.स.सदस्य दिनेश गावंडे, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास दोनोडे पंचायत समिती सदस्य विनोद नवघडे, पुनम बगमारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती मुरलीधर बगमारे, अॅड. गोविंद भेंडारकर, राजेश पिलोर दामोधर राऊत, डॉ. देविदास जगनाडे, डॉ. हितेंद्र धोटे, फाल्गुन राऊत, प्रा. श्याम झाडे, महादेव दर्वे, लोकमान अलोणे, सचिन कठाने, वनिता हेमणे, विजय भेंडारकर, प्रा. दिगांबर चौधरी, शिवदास कोरे, पुरुषोत्तम राऊत, प्रा. मंगेश गुरपुडे, प्रा. श्रीकांत राऊत, सुरज भेंडारकर, घनश्याम नवघडे, पितांबर गोंगल, अशोक गुरूपुडे, यशवंत भेंडारकर, डॅनीअल देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)