अंधारी नदीतून अवैध रेती उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:45 PM2018-04-02T23:45:12+5:302018-04-02T23:45:12+5:30
देवाडा खुर्द येथील गावकऱ्यांना अंधारी नदीपात्रातून नळाद्वारे पाणी दिले जाते. मात्र सद्यस्थितीत अंधारी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीने बंधारा बांधून पाण्याची व्यवस्था केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : देवाडा खुर्द येथील गावकऱ्यांना अंधारी नदीपात्रातून नळाद्वारे पाणी दिले जाते. मात्र सद्यस्थितीत अंधारी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीने बंधारा बांधून पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गावाला निदान दिवसाआड नळाचे पाणी मिळत आहे. परंतु, रेतीघाट कंत्राटदारांकडून निर्धारित जागेपेक्षा अधिक जागेतून खनन होत असल्याने बंधाराही कोरडा पडायला लागला आहे. त्यामुळे गावकºयांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात जास्त लोकवस्तीचे गाव म्हणून देवाडा खुर्द गावाची ओळख आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी आपल्या घरी बोअर खोदले. परंतु, लाखोंचा खर्च करूनही पाणी लागले नाही. परिणामी एप्रिल महिन्यातच गावातील विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक शिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून आपली तहाण भागवितात.
गावकऱ्यांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत अंधारी नदीकाठावर नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली. नळाद्वारे पाणी सोडले जाते. मात्र गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने नदीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमार्फत सिमेंटच्या पिशव्यांमध्ये रेती भरून नदीवर बंधारा बांधण्यात आला.
यामुळे पाणी अडून काही प्रमाणात व्यवस्था झाली. परंतु, रेती ठेकेदारांनी या बंधाºयाच्या मागील भागात रेती खननाचा सपाटा सुरू केल्याने बंधाºयातील पाणी उपसा होत असलेल्या रेतीच्या खड्ड्यांमध्ये आहे. त्यामुळे बंधाºयातील पाणी दिवसागणिक कमी होत आहे. निर्धारित जागेपेक्षा जास्त जागेतून रेती उपसा करून ठेकेदार लाखो रुपये कमवण्यात व्यस्त आहे. यामुळे पोंभूर्णा तालुका प्रशासनाची अवैध खननाला मूक संमती तर नसावी ना, असा प्रश्न गावकºयांकडून केला जात आहे.
सध्या तीव्र उन्हाळा सुरू झालेला नाही. मात्र गावातील नागरिकांना पाणी टंचाई जाणवत आहे. तर मे महिन्यात काय होणार, असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असे विदारक चित्र या गावामध्ये सुरू आहे. नदी पात्रातील अशुद्ध पाण्यावरच गावाची तहान भागते. मात्र ते अशुद्ध पाणी सुद्धा गावकºयांना मिळणे दुरपास्त होत आहे. यावर प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने गावकºयांत रोष पसरला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वचक नसल्याने रेती तस्कर झाले गब्बर
रेती खनन करणाºया ठेकेदारांकडून किती जागेतून रेती खनन केले जात आहे, याकडे मात्र महसूल विभागाची डोळेझाक होत असल्याने रेती ठेकेदार लाखो रुपये कमवून मालामाल होत आहेत. रात्रंदिवस चालणाऱ्या रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजले असून यात पोलीस विभागही सुस्त दिसून येते. तस्करांवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने रेती व्यवसायिकांना रान मोकळे असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर तत्काळ आळा घालून देवाडा खुर्दवासीयांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करून देण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.