राजुरा वनपरीक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:09+5:302021-06-10T04:20:09+5:30
राजुरा : मागील काही दिवसांपासून राजुरा वनपरिक्षेत्रात हरणासह वाघाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाने सविस्तरपणे चौकशी करावी, या ...
राजुरा : मागील काही दिवसांपासून राजुरा वनपरिक्षेत्रात हरणासह वाघाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाने सविस्तरपणे चौकशी करावी, या मागणीचे निवेदन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांच्या नेतृत्वात वनविभागाला देण्यात आले.
५ जूनला सायंकाळी व ६ जूनला सकाळीच राजुरा-आसिफाबाद मार्गावर सुमठाना नियतक्षेत्रात दोन दिवसात दोन हरणांचा, तर मध्य चांदा वनविभाग, राजुरा वनपरीक्षेत्राच्या विहीरगाव उपक्षेत्रात नियतक्षेत्र कक्ष १७२ मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे रात्रीच या वाघाचे शवविच्छेदन करून परस्पर त्या वाघाची विल्हेवाट लावण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची उच्यस्तरीय चौकशी व्हावी, याकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे जिल्हाधिकारी, चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक, मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक, राजुराचे उपविभागीय वनअधिकारी व वनपरीक्षेत्र अधिकारी यांना निवेदने देण्यात आले. यावेळी नेफडोचे जिल्हा संघटक विजय जांभूळकर, तालुका अध्यक्ष संतोष डेरकर, आशिष करमरकर, पूर्वा खेरकर, सुजीत पोलेवार, संदीप आदे, सुनैना तांबेकर, मेघा धोटे यांची उपस्थिती होती.