इरई नदीचे जलस्त्रोत प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:53 PM2017-11-14T22:53:37+5:302017-11-14T22:53:55+5:30

चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे

Ira river water pollution is polluted | इरई नदीचे जलस्त्रोत प्रदूषित

इरई नदीचे जलस्त्रोत प्रदूषित

Next
ठळक मुद्देमहानगर पालिकेचे दुर्लक्ष : शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे
पाणीपुरवठा करणाºया तीन मोठ्या विहिरी इरई नदीपात्रात आहेत. यातून रामनगर जलशुद्धीकरण केंद्रावरुन शहरातील सुमारे ४० टक्के भागाला दररोज पाणीपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या नदी पात्रामध्ये शहरातील कचºयापासून तर शासकीय व खासगी रुग्णालयातील घाणकपडे मोठ्या प्रमाणात या विहिरीजवळ धुण्यास आणल्या जात आहे. रुग्णालयातील कपड्यांमध्ये आॅपरेशनपासून ते गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे कपडे व चादरींचे प्रमाण जास्त आहे. शहरात घाट नसल्यामुळे काही व्यावसायिक या ठिकाणी कपड्यांची धुलाई करतात त्यामुळे रुग्णालयातील कपड्यांची घाण व धुण्यासाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळते. या मार्गावर बाजार समिती व एमआयडीसी असल्यामुळे येथे येणारी वाहनेदेखील याच पात्रात मोठ्या प्रमाणात धुण्यात येत आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया विहिरी भोवतालचे संपूर्ण पाण्याचे पात्र गटारीच्या पाण्यासारखे काळ झाले आहे. या घटनेकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका प्रशासनाने दूर्लक्ष करत आहे. जलबिरादरीने या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होणाºया भागातील आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची वेळ येऊ शकते, असा धोका जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी वर्तविला आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी
इरई नदीचे जलस्त्रोत प्रदुषित होत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. चंद्रपूर शहराची जलवाहिनी म्हणून ओळखणाºया इरई नदीचा नैसर्गिक पोत दिवसेंदिवस खराब होत आहे. यावर आळा घातला नाही, तर येणाºया काही वर्षांत नदीचे पाणी प्राशन करणे अशक्य होईल. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगर पालिका प्रशासनाने पाणी प्रदुषणाला प्रतिबंध घालावा, अशी मागणी जलबिरादरीने केली.
 

Web Title: Ira river water pollution is polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.