रेल्वे इंजिनच्या चाकात अडकली लोखंडी सळाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:35 AM2021-09-16T04:35:15+5:302021-09-16T04:35:15+5:30
माजरी : माजरी-नागपूर ते चंद्रपूर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी दुपारपासून इमर्जंन्सी कामामुळे माजरी - भांदक या रेल्वेमार्गावर माजरी गेट ...
माजरी : माजरी-नागपूर ते चंद्रपूर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी दुपारपासून इमर्जंन्सी कामामुळे माजरी - भांदक या रेल्वेमार्गावर माजरी गेट क्र.३२ वरुन रोड वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत इंजिनिअर ब्लॉक संपल्यावर अप-लाईनवर एका गॅंगमेन जवळची लोखंडी सळाक रेल्वे रुळावर सुटल्याने रात्री उशिरा मोठे अपघात होण्याचे टळले.
सोमवार दुपारी ३ वाजतापासून दिल्ली - चेन्नई मुख्य मार्गावर नागपूर ते चंद्रपूर दरम्यान माजरी रेल्वे गेट क्र.३२ येथे रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान काम करीत असताना उशिरा अंधार होईपर्यंत काम केल्याने एका गॅंगमेन जवळची लोखंडी सळाक रेल्वे रुळावर पडली. ही सळाक रात्री ३ वाजताच्या दरम्यान चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या अप लाईनची ट्रेन क्रमांक ००७६१ या मालवाहक गाडीच्या इंजिनच्या चाकामध्ये फसल्याने ही ट्रेन समोर जाऊन माजरी रेल्वे जंक्शनजवळ थांबली. त्यानंतर तपासणी करीत ही सळाक मोठ्या संघर्षानंतर चाकातून बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या सळाकीमुळे रेल्वे रुळाच्या बाहेर निघाली नाही, नाहीतर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत रेल्वे अभियंता मुकुटदम भंवरलाल मीना यांना विचारले असता कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच स्टेशन मास्टरला याबाबत विचारले असता त्यांनी ही घटना माजरीची नव्हे असे सांगितले. मात्र वरोरा रेल्वे विभागातून याबाबत दुजोरा मिळाला.
150921\img-20210913-wa0057.jpg
रेल्वे इंजिनच्या चाकीत फसला लोखंडी सब्बल : मोठी अपघात होता होता टळले
माजरी रेल्वे गेट जवळ काम सुरू असताना गेंगमेंनची सुटली होती सब्बल