शहरात अनियमित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:23+5:302021-03-01T04:32:23+5:30
वाहनांवर बंदी घालावी चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, ...
वाहनांवर बंदी घालावी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वार प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
स्वागत फलक झाले गायब
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पांढरकवडा बससेवा सुरू करा
गडचांदूर : गडचांदूर हे शहर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथून अनेक भागात जाण्यासाठी बससेवा आहे. मात्र, पांढरकवडासाठी थेट बससेवा नाही, तसेच आदिलाबाद हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
बंगाली कॅम्प भाजीबाजारात कचरा
चंद्रपूर: येथील बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांची भीती अधिकच वाढली आहे.
संग्रहालय उभारण्याची मागणी
चंदपूर: जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होईल. त्या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल. पुरातत्त्व विभागाने लक्ष देऊन संग्रहालय उभारावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
जिवतीत विज्ञान महाविद्यालय उभारावे
जिवती : जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या जिवती तालुक्यात एकही विज्ञान शाखेचे पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावे लागते. या ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेचे पदव्युत्तर महाविद्यालय सुरू केल्यास शिक्षणाची गैरसोय होईल. या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठाने येथे अनुदानित महाविद्यालयाला मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.