कर्ज पुनर्गठणामध्ये अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:40+5:30

मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावे लागल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Irregularities in debt restructuring | कर्ज पुनर्गठणामध्ये अनियमितता

कर्ज पुनर्गठणामध्ये अनियमितता

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप : भद्रावतीतील अनेक शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रवती : राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पुनर्गठणामध्ये अनियमितता झाली असून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आयोजित बैठकीमध्ये करण्यात आली. दरम्यान, २५० शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावे लागल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तहसीलदार महेश शितोडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, भाजपाचे महामंत्री नरेंद्र जिवतोडे, पंचायत समिती सभापती प्रविण ठेंगणे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ, विविध गावातील शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक असे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा कथन केली. बँका पासबुक देत नाही, शेअर कपात चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.
सहकारी क्षेत्राच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी करून शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अहवाल सादर करण्याचे आदेश
तालुक्यातील नंदोरी, डोंगरगाव, टाकळी, विसलोन, चालबर्डी, वडाळा व अन्य गावामधील २०० ते २५० शेतकरी यावेळी उपस्थिती होते. संबंधित बाबींची योग्य ती चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी सेवा संस्था तथा बँकाच्या प्रतिनिधींना तहसीलदार शितोडे यांनी दिले.

Web Title: Irregularities in debt restructuring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.