चिचाळा व परिसरातील सहा गावांना सिंचन सुविधेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:37+5:30

अवघ्या सहा महिन्यात सुमारे १३४७ हेक्टर शेताला पाणी पुरेल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत याप्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला मिळणार आहे. सदर योजनेचे पाणी चिचाळा, दहेगाव, मानकापूर, दळदी, ताडाळा, वेडी रिट आणि गोठणगाव रिठ येथील शेतकऱ्यांच्या शेतीला या योजनेचा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

Irrigation facility to six villages in and around Chichala area | चिचाळा व परिसरातील सहा गावांना सिंचन सुविधेचा लाभ

चिचाळा व परिसरातील सहा गावांना सिंचन सुविधेचा लाभ

Next
ठळक मुद्देदुबार पेरणीलाही बळ : १३४७ हेक्टर जमीन येणार पाण्याखाली, माजी अर्थमंत्र्यांनी मंजूर केला होता २३ कोटींचा निधी

भोजराज गोवर्धन।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्याकरिता २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून केवळ सहा महिन्यात चिचाळा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षीपासून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याचे काम आता जलदगतीने सुरू झाले आहे.
मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग राहतात. विशेषत: शेतीवर अवलंबून आपली उपजिविका करणारे शेतकरी तालुक्यातील चिचाळा परिसरात राहतात. मात्र शेती करण्यासाठी पुरेशा सिंचनाची सोय या परिसरात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी राज्याचे माजी अर्थ नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, मुनगंटीवार यांनीही शेतकऱ्यांच्या या मागणीकडे प्रामुख्याने लक्ष देवून सुमारे २३ कोटी रुपये मंजूर केले होते. या प्रकल्पाचे काम पुणे येथील एन. एन. के. कन्स्ट्रक्शन कंपनीने या कामाला सुरूवात केली.
अवघ्या सहा महिन्यात सुमारे १३४७ हेक्टर शेताला पाणी पुरेल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत याप्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला मिळणार आहे. सदर योजनेचे पाणी चिचाळा, दहेगाव, मानकापूर, दळदी, ताडाळा, वेडी रिट आणि गोठणगाव रिठ येथील शेतकऱ्यांच्या शेतीला या योजनेचा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
सदर योजनेचे काम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, मूल येथील उपविभागीय अभियंता एस. बी. सोनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले आहे. जानेवारी २०१९ रोजी सदर योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती, आणि केवळ सहा महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करून शेतीला पाणी पुरवठा करण्यात आला. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
येणाºया रब्बी हंगामात दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरणार आहे.

मोलझरी तलावाचीही दुरुस्ती
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत भूमिगत पाईप लाईनच्या माध्यमातून कमी दिवसात काम पुर्ण करून शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था करून देणारी ही योजना विदर्भातील पहिली आहे. असाच प्रयोग सिंधुदुर्ग येथे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र अजून तरी काम पूर्ण झालेले नसल्याचे बोलल्या जाते. चंद्रपूर जिल्ह्यात अपुऱ्या सिंचन व्यवस्थेची बोंब नेहमीच असते. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी मूल तालुक्यात सिंचनावर कामाला सुरूवात केलेली आहे. गेल्या ४० वर्षांपासून पाण्याची गळती असलेल्या मोलझरी तलावाच्या दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आल्याने महादवाडी, नागाळा, फुलझरी येथील शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात फायदा होत आहे. तालुक्यात बंधाऱ्यांचे बांधकामही जलदगतीने सुरू आहे. करोडो रूपयांचा निधी केवळ सिंचनासाठी मंजूर केला आहे. सदर निधीमधील अनेक कामे प्रत्यक्षात सुरू आहेत. चिचाळा व नजिकच्या सहा गावामध्ये नळजोडणीमार्फत सिंचन सुविधा पुरविण्याचा २३ कोटींवर निधी मंजूर करून शेतीला पाणी पुरवठा केल्याबद्दल चिचाळा व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Irrigation facility to six villages in and around Chichala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.