चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आॅक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:15 PM2019-06-26T23:15:52+5:302019-06-26T23:16:11+5:30
चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत फारच अल्प पाऊस पडला. त्यामुळे जलसाठ्या पाहिजे तसा पाण्याचा साठा होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत जिल्ह्यात सूर्याने आग ओकली. पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. या तीव्र उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटू लागले. मे महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प चिंताजनक स्थितीत आले होते. केवळ इरई धरणात बºयापैकी जलसाठा होता. मात्र चंद्रपूर शहर व चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यांना पाणी पुरविताना इरई धरणाचाही जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. या प्रकल्पात आता केवळ २८.५० टक्के जलसाठा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई व नलेश्वर सिंचन प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. म्हणजेच या धरणात सध्या ठणठणाट आहे. अमलनाला धरणात ११.८३ टक्के, लभानसराड प्रकल्पात ६.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ९.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १४.१९ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ७.४६ टक्के, चारगाव धरणात १५.५६ टक्के, लालनाला प्रकल्पात १५.०३ टक्के तर आसोलामेंढा प्रकल्पात २४.३८ टक्क़े जलसाठा आहे.
आता शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकºयांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.
मामा तलावाची स्थितीही चिंताजनक
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ४१.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३५ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक आहे.