नक्षलग्रस्त भागात प्रथमच आयएसओ मानांकन

By admin | Published: January 28, 2017 12:58 AM2017-01-28T00:58:42+5:302017-01-28T00:58:42+5:30

गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी आएसओ हे मानांकन नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या दुर्गम भागातील गडचांदूर

ISO rating for the first time in Naxal-affected areas | नक्षलग्रस्त भागात प्रथमच आयएसओ मानांकन

नक्षलग्रस्त भागात प्रथमच आयएसओ मानांकन

Next

गडचांदूर एसडीपीओ कार्यालय : प्रजासत्ताकदिनी प्रमाणपत्र प्रदान
चंद्रपूर : गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी आएसओ हे मानांकन नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या दुर्गम भागातील गडचांदूर येथील पोलीस उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाले आहे. नलक्षग्रस्त भागातील शासकीय कार्यालयाला प्रथमच आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.
जिल्ह्यातील जिवती तालुका नक्षलग्रस्त भागाच्या यादीत आहे. . गडचांदूर या पहाडावरील दुर्गम भागातील उपविभागीय अधिकारी कार्यालयालयाने नागरिकांना तत्पर सेवा देतानाच त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. कार्यालय परिसरात स्वच्छता राखणे, कार्यालयातील अभिलेख नियमावलीनुसार अद्यवत ठेवणे आदी कामांवर लक्ष केंद्रीत करून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी कामाला सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान आणि अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आयएसओ मानांकन देणाऱ्या आंतराष्ट्रीय प्रमाणके संघटनेनेच्या पथकाने या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. गडचांदूर पोलीस उपविभागीय कार्यालयाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक दिवान, अपर पोलीस अधीक्षक राजपूत आणि एसडीपीओ खिरडकर यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह, डीवायएसपी जयचंद काठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

प्रतिकूल परिस्थितीत राखला दर्जा
गडचांदूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिवती, गडचांदूर, पाटण, कोरपना, टेकमांडवा, भारी, पिट्टीगुडा आदी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. हे सर्व पोलीस स्टेशन दुर्गम आणि पहाडी क्षेत्रामध्ये आहेत. दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थिती असताना कामात सातत्य राखण्यात यश आले. गडचांंदूर एसडीपीओच्या कार्यक्षेत्राला लगत परराज्याची सीमा आहे.
आठ कार्यालयांना आयएसओ प्रमाणपत्र
यापूर्वी सर्वात प्रथम चंद्रपूर पोलीस उपविभागीय कार्यालयाने हा मान पटकाविला. याशिवाय चंद्रपूर एसडीपीओअंतर्गत कार्यरत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारशाह या पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच चंद्रपूर वाहतूक शाखेला व राजुरा पोलीस ठाण्यालाही हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

Web Title: ISO rating for the first time in Naxal-affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.