राजुरा पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

By admin | Published: July 12, 2014 01:04 AM2014-07-12T01:04:44+5:302014-07-12T01:04:44+5:30

जिल्ह्यातील पहिले आएएसओ ९००१-२००८ प्रमाणित पोलीस ठाणे बनण्याचा मान राजुरा पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे.

ISO rating to Rajura police station | राजुरा पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

राजुरा पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

Next

राजुरा : जिल्ह्यातील पहिले आएएसओ ९००१-२००८ प्रमाणित पोलीस ठाणे बनण्याचा मान राजुरा पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे. पोलीस ठाण्यातील कामकाजात सुधारणा तसेच व्यवस्थाबघून हा दर्जा देण्यात आला आहे. आयएसओ प्रमाणिक पोलीस ठाण्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी गुरुवारी केले.
क्वालिटी मॅन्युअलनुसार पोलीस ठाण्यात नियमित कामकाज, कायदा व सुव्यवस्थेमध्ये सुधारणा, गुन्ह्यांमध्ये घट, तकारींचा त्वरित निपटारा, तसेच नागरिकांना अन्य सेवा देण्यात येत आहे. कामकाजाचा स्तर उंच झाला आहे. अभिलेख आधुनिक बनविल्यास सदर प्रमाणपत्र मिळते. आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही पोलीस ठाण्याला सदर प्रमाणपत्र मिळाले नाही.
पोलीस अधीक्षक राजीव जैन, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुहेल शर्मा यांनी मागील तीन महिन्यात सर्व कामकाजात सुधारना केली आहे. ठाण्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
या कार्याची दखल घेऊन नागपूर येथील आयएसओ टीन ने क्वालिटी मॅन्युअल, वर्क अन्सट्रक्शन, एसओपी, पोलीस ठाण्यातील फाईल्स, पोलिसांची कार्य करण्याची पद्धत, भवन, स्वच्छता आदींचे निरीक्षण करून सदर प्रमाणपत्र दिले आहे.
प्रमाणपत्र मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांच्या हस्ते या पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, राजुरा, गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: ISO rating to Rajura police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.