नगरपरिषदेत गाजला डायरी मुद्रणाचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:45 AM2018-02-18T00:45:25+5:302018-02-18T00:45:54+5:30

नगरपरिषदेत सर्वसाधारण सभा सुरू असताना मागील सभेचे अहवाल वाचनातून डायरी मुद्रणाचा विषय निघाला. दरम्यान, या विषयावर सत्तारुढ पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविताना गदारोळ झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी सभात्याग केल्याची घटना शुक्रवारी घडली.

The issue of printing presses in the Municipal Council | नगरपरिषदेत गाजला डायरी मुद्रणाचा वाद

नगरपरिषदेत गाजला डायरी मुद्रणाचा वाद

Next
ठळक मुद्देगोंधळातच सभा तहकूब : मुख्याधिकाऱ्यांचा सभात्याग

ऑनलाईन लोकमत
गडचांदूर : नगरपरिषदेत सर्वसाधारण सभा सुरू असताना मागील सभेचे अहवाल वाचनातून डायरी मुद्रणाचा विषय निघाला. दरम्यान, या विषयावर सत्तारुढ पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविताना गदारोळ झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी सभात्याग केल्याची घटना शुक्रवारी घडली. या गोंधळातच सभा तहकूब झाल्याने विकास कामांवर चर्चाच होवू शकली नाही.
गडचांदूर नगरपरिषद सध्या शौचालय गैरव्यवहार गाजत आहे. या प्रकरणावरून मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, सत्तारूढ नगरसेवकांमध्ये कलह सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच शौचालय भ्रष्टाचार झाला असून त्यांनी केवळ विभाग प्रमुखालाच निलंबित केले. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी संजय जाधव यांना निलंबित करावी, अशी मागणी नगराध्यक्ष विजायलक्ष्मी डोहे, गटनेते नीलेश ताजने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे विकास कामांच्या प्रश्नांवरून नगर परिषदेत सतत वादळ उठत आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. शौचालय आणि कर वसुली भ्रष्टाचार व इतर विकास कामांवर चर्चा करण्याचे नियोजन ठरले होते. सभा सुरू झाल्यानंतर नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी डायरी मुद्रणाचा विषय उपस्थित केला. दरम्यान, नगरसेवक सचिन भोयर यांनीही आक्षेप घेतला. परिणामी, हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. मात्र, समाधान न झाल्याने पुन्हा गोंधळ वाढला. मुख्याधिकारी जाधव हे मुख्याधिकारी फारसे राहत नाहीत. नाशिकला त्यांचे सर्वाधिक दौरे होतात. त्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत, असा आरोप नगराध्यक्ष डोहे व गटनेते ताजने यांनी केला आहे. सभेत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने नियुक्त केलेला प्रतिनिधी आहे. नियमबाह्य कामे होऊ देणार नाही. सत्तारूढ नगरसेवक माझ्यासह अधिकारी कर्मचाºयांवर दबाव आणून कामे करतात. सर्वसाधारण सभेप्रसंगी गटनेते व काही नगरसेवक टेबल ठोकून बोलत होते. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तयार नव्हते. माझा अपमान झाल्यामुळे मी सभात्याग केला.
- संजय जाधव
मुख्याधिकारी न. प. ग़डचांदूर.

नगर परिषद क्षेत्रात शौचालय बांधकामात गैरव्यहार झााल्याची माहिती मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे दिली. पण, त्यांनी उत्तर दिले नाही. याप्रकरणी मला माहिती घ्यायची होती. परंतु, हा विषय येताच मुख्याधिकारी सभा सोडून गेले. हा सभागृहाचाच अपमान आहे. वरिष्ठ ेअधिकाºयांनी कारवाई करावी.

- विजयालक्ष्मी डोहे
अध्यक्ष, न.प. ग़डचांदूर.

मुख्याधिकारी जाधव आल्यापासून शहराची विकासकामे प्रलंबित असून गैरव्यवहार वाढला आहे. शहरात ते कधीही फेरफटका मारत नाही. सतत गैरहजर असतात. गैरव्यवहार प्रकरणात तेदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे शासनाने निलंबनाची कारवाई करावी.
- नीलेश ताजने, गटनेते, न. प. ग़डचांदूर.

Web Title: The issue of printing presses in the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.