रेल्वे उड्डाण पुलाचा वाद मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:00 PM2018-08-05T23:00:03+5:302018-08-05T23:00:26+5:30
येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. अखेर, यावर दोन्ही बाजुंच्या लोकांशी झालेल्या निर्णायक चर्चेअंती पुलाच्या उतार भागाची बांधणी कशी असावी, यावर एकमत होऊन हा वाद संपुष्टात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. अखेर, यावर दोन्ही बाजुंच्या लोकांशी झालेल्या निर्णायक चर्चेअंती पुलाच्या उतार भागाची बांधणी कशी असावी, यावर एकमत होऊन हा वाद संपुष्टात आला आहे.
कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने नवीन आखणीचा नकाशा, त्याला येणारा खर्चास मंजूरी याकरिता बराच वेळ जाणार आहे. यामुळे, पुलाचे काम थोडे लांबणीवर पडले आहे. पण, या पुलाबाबत उफळलेला वाद एकदाचा मिटला. सुमारे ४० वर्षापूर्वी हा उड्डाण पूल तयार बांधण्यात आला. आता तो काहीसा जीर्ण झाला असल्याने रेल्वे विभागाने नगर परिषदेची मदत घेऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. पुलाचा वस्तीकडील उतार भाग तोडून तो पूर्वीसारखाच ठेवण्याचे ठरले होते. परंतु, उतार भागाजवळ असलेल्या रहिवाशांनी आता पुलाचा उतार भाग आमच्या घरांपुढे नको, घरापुढील जागा मोकळी हवी, त्यामुळे तो निमुळता घ्या, असे म्हणत काही भागात पायºया कराव्यात, अशी मागणी करुन या पुलाचे काम बंद पाडले.
अखेर, नगर परिषद प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांना, लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा घडवून आणली आणि पूल बांधणीचा सूवर्णमध्य समोर आणून चर्चेअंती त्याला मंजुरी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला. पुलाचे उर्वरीत काम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सभेला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, उपाध्यक्ष मीना चौधरी, रेल्वे विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.