गोपानीतील कामगार कपातीचा मुद्दा सहायक कामगार आयुक्तांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:35 AM2021-09-16T04:35:24+5:302021-09-16T04:35:24+5:30
कंपनीने कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्यामुळे ३ सप्टेंबरला नोटीस बोर्डावर नोटीस लावून कामगारांना कमी केल्याचे यावेळी कंत्राटदार देवराव भोंगळे ...
कंपनीने कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्यामुळे ३ सप्टेंबरला नोटीस बोर्डावर नोटीस लावून कामगारांना कमी केल्याचे यावेळी कंत्राटदार देवराव भोंगळे यांच्यासह अन्य कंत्राटदारांनी बैठकीत सांगितले. तसेच कामगार संघटनेच्यावतीने दिनेश चोखारे यांनी कामगारांची बाजू मांडताना, कामगारांचे जुलै २०२१ ते १७ सप्टेंबर २०२१ पर्यंतचे वेतन देण्याची मागणी केली. यासोबतच कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, याकडे लक्ष वेधून, त्यांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणी केली.
बाॅक्स
कंपनीला मागितला नाजूक स्थितीचा अहवाल
बैठकीत कंपनी व्यवस्थापनाच्यावतीने, गोपानी आर्यनचे उत्पादन बंद असल्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू नाजूक असल्याची बाब मांडली. यावर सहायक कामगार आयुक्तांनी, कंपनीने याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. याकडे आता कामगारांचे लक्ष लागले आहे.