शिक्षकांच्या वेतनातील कपातीचा मुद्दा अद्यापही अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:32+5:302021-08-13T04:31:32+5:30

चंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत वर्ग ३ व वर्ग ४ च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बँक कर्ज हफ्ते, ...

The issue of teacher pay cuts is still unresolved | शिक्षकांच्या वेतनातील कपातीचा मुद्दा अद्यापही अधांतरीच

शिक्षकांच्या वेतनातील कपातीचा मुद्दा अद्यापही अधांतरीच

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत वर्ग ३ व वर्ग ४ च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बँक कर्ज हफ्ते, संस्थेचे हफ्ते व इतर वजाती वेळेवर त्या-त्या संस्थेला, बँकेला मुदतीत जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यावर नाहक भुर्दंड बसत आहे. यासंदर्भात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर २०२० ला काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नाही. त्यानंतर आता पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी एक पत्र काढून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनातील कपातीचा मुद्दा कधी आता तरी सुटणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेकडून आवंटन प्राप्त होताच पंचायत समितीमार्फत निव्वळ देय पगार शिक्षकांना मिळण्यासाठी कार्यवाही होते; परंतु बँकेचे कर्ज, एल.आय.सी., जी.पी.एफ., सोसायटी कर्ज, आवर्ती रकमा आदी कपात केलेली रक्कम यंत्रणेला मासिक वेतन होताच पाठविण्यात येत नाही. त्यामुळे शिक्षकांनी घेतलेल्या कर्जावर नाहक व्याज वाढत आहे. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी २७ नोव्हेंबर २०२० मध्ये परिपत्रक काढून प्रत्येक महिन्याच्या मासिक वेतन आहारित केल्यापासून किमान १५ दिवसांच्या आत संबंधित बँक, पतसंस्था व इतरांकडे कर्ज हफ्त्याच्या कपातीची, भविष्य निर्वाह निधी, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाची रक्कम व इतर वजाती रक्कम जमा करणे अनिवार्य केले होते; परंतु या परिपत्रकाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यानंतर आता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी ११ ऑगस्ट रोजी पत्र काढून संबंधितांना आठवन करून दिली आहे. त्यामुळे आता तरी यासंदर्भात कार्यवाही होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाॅक्स

निवेदन देऊनही उपयोग नाही

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) सह अन्य शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली. मात्र, केवळ पत्र प्रशासन मोकळे झाले आहे. त्यामुळे शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. किमान आता तरी

वेळेवर कपाती रक्कम भरावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) प्रकाश चुनारकर, मोरेश्वर गौरकार, संजय लांडे, अजय बेदरे, अमोल देठे, विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, सुशांत मुनगंटीवार, संतोष जिरकुंटवार, मधुसूदन रेड्डी, योगिनी दिघोरे, राजेंद्र पांडे, सुनील टोंगे, सुंदर धांडे, अश्विनी ताटीपामूलवार, विलास बोबडे, विकास तुरारे, किशोर मून, नरेंद्र चौखे, दिलीप राठोड, विकास कुळसंगे, सतीश दुवावार, विनोद बाळेकरमरकर, प्रभाकर महाकरकार, राकेश मांडवकर, गणेश प्रधान, दिनेश टिपले, सतीश तन्नीरवार, बंडूजी गायगोले, बंडू गंधेवार यांनी केली आहे.

Web Title: The issue of teacher pay cuts is still unresolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.