समाजभान जोपासणाऱ्या सेवाभावी संस्‍थांना मदत करणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:48+5:302021-05-19T04:29:48+5:30

चंद्रपूर : डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीसारख्‍या सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वनवासी व दुर्गम भागात आरोग्‍य सेवा दिली जाते. समाजभान ...

It is important to help charitable organizations that cultivate social consciousness | समाजभान जोपासणाऱ्या सेवाभावी संस्‍थांना मदत करणे महत्त्वाचे

समाजभान जोपासणाऱ्या सेवाभावी संस्‍थांना मदत करणे महत्त्वाचे

Next

चंद्रपूर : डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीसारख्‍या सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वनवासी व दुर्गम भागात आरोग्‍य सेवा दिली जाते. समाजभान जोपासत कार्य करणाऱ्या अशा सेवाभावी संस्‍थांना ८ ऑक्‍सिजन कॉन्सेंट्रेटर आणि ५० हजार मास्‍क आम्‍ही वितरित केले. या माध्‍यमातून कोरोनाच्‍या लढाईत योगदान देण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. गेल्‍या वर्षभरापासून भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून सेवाकार्य अव्‍याहतपणे सुरू आहे. ऑक्‍सिजन कॉन्सेंट्रेटरसाठी नितीनजी गडकरी यांचे लाभलेले सहकार्य आमच्‍यासाठी लाखमोलाचे आहे, असे मत माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूरचे अध्‍यक्ष वसंतराव थोटे, सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर ही संस्‍था सन १९८० पासून वनवासी क्षेत्रात आरोग्‍य व शैक्षणिक विषयक कार्य करीत आहे. वनवासी क्षेत्रात वसतिगृह, फिरते चिकित्‍सालय या संस्‍थेच्‍या माध्‍यमातून कार्यरत आहे. अशा सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन वनवासी भागात आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करण्‍याला हातभार लागणे महत्त्वाचे आहे, असे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

Web Title: It is important to help charitable organizations that cultivate social consciousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.