प्रत्येकाच्या सहकार्यामुळेच काम करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:59+5:302021-09-09T04:33:59+5:30
ज्येष्ठ सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन ...
ज्येष्ठ सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मंगेश काळे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे, सत्कारमूर्ती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. अविनाश सोमनाथे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. वटी, डाॅ. कडूकर, पशुधन विकास अधिकारी डाॅ. धांडे, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रीती खारतुडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मंगेश काळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सोमनाथे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. मंगेश काळे, अशोक मातकर, पचारे, डाॅ. वटी, डाॅ. कडूकर, डाॅ. धांडे, प्रीती खारतुडे, सहायक पशुधन विकास अधिकारी डाॅ. बंडू आकनुरवार, डाॅ. दिलीप भुसारे, कार्यालयाच्या वतीने डाॅ. सोनाली मेश्राम, कार्लेकर, कनिष्ठ ्रशासन अधिकारी दिघोडे, संदीप राठोड, पराते, प्रियंका यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन डाॅ. आकनुलवार, प्रास्ताविक डाॅ.दिलीप भुसारी यांनी मानले.