ऐतिहासिक वारसा जतन करणे ही सर्वांची जवाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:28 AM2017-08-05T00:28:25+5:302017-08-05T00:28:53+5:30
शहरातील चंद्रपूूर किल्ला परकोट दुर्लक्षीत होता. या ऐतिहासिक वास्तूकडे इको-प्रोने फक्त लक्षच दिले नाहीतर, त्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील चंद्रपूूर किल्ला परकोट दुर्लक्षीत होता. या ऐतिहासिक वास्तूकडे इको-प्रोने फक्त लक्षच दिले नाहीतर, त्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले. ऐतिहासिक वारसा कुणा एका व्यक्तीचा, समुंहाचा नसून तो सवार्चा आहे. त्याचे संवर्धन करणे सवार्ची जवाबदारी आहे, सवार्नी एकत्रीत येऊन याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे व्यक्तीगत कार्य नसून हे शहराचे, राज्याचे तसेच देशाचे कार्य आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.
चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानस्थळी शुक्रवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली. स्थानिक बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिरपर्यत किल्ल्यावरून फिरून किल्ला व बुरूजांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील १ मार्चपासून चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. तीन आॅगस्टला या अभियानास १५० दिवस पूर्ण झाले आहे. मागील १५० दिवसांपासून संस्थेचे कार्यकर्ते सकाळच्या वेळेस नियमीत श्रमदान करून किल्ल्यावरील स्वच्छता करीत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी सलील यांनी अभियान स्थळी भेट दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांना महात्मा गांधी यांची पेंटीग भेट दिली. यावेळी डॉ गुलवाडे, प्रशांत आर्वे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, धर्मेंद लुनावत, तसेच इको-प्रो संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.