जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अखेर रद्द

By admin | Published: July 23, 2015 12:49 AM2015-07-23T00:49:56+5:302015-07-23T00:49:56+5:30

गडमौशी तलावाच्या कालव्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सिंदेवाहीचे विनेशकुमार लक्ष्मीकुमार जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले.

Jaiswal's Gram Panchayat membership canceled soon after | जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अखेर रद्द

जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अखेर रद्द

Next

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : अतिक्रमण करणे पडले महागात
चंद्रपूर : गडमौशी तलावाच्या कालव्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सिंदेवाहीचे विनेशकुमार लक्ष्मीकुमार जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच केली.
विनेशकुमार लक्ष्मीकुमार जयस्वाल हे सिंदेवाही ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. जयस्वाल यांनी लोणवाही येथील भूमापन क्रमांक ७७१ व उपनगर क्रमांक ७६८ व ७७९ च्या गडमौशी तलावाच्या मुख्य पाण्याच्या नहराच्या जागेवर अतिक्रमण केले होते. त्याविरूद्ध मनोहर पवार यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे २५ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.
घोडाझरी उपविभागाचे उपअभियंता यांनी जागेची मोजणी करून तहसीलदार आणि भूमिअभिलेख कार्यालयाकडे अहवाल पाठविला.
त्यानंतर तहसीलदारांनी तत्काळ जमिनीचे मोजमाप करावे, मोजणीदरम्यान अडथळा आल्यास पोलीस विभागाची मदत घ्यावी, असे सुचविले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केलेल्या मोका चौकशीत अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जयस्वाल यांचे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-३) नुसार ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Jaiswal's Gram Panchayat membership canceled soon after

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.