जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:42 AM2017-10-05T00:42:02+5:302017-10-05T00:42:16+5:30

देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही.

Jaitapur residents walk through the mud | जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राजुरा-कोरपना सीमावर्ती भागातील गावे सुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ही एक शोकांतिका राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर गावास जाणाºया रस्त्याकडे पाहिल्यावर दिसून येते.
राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेले जैतापूर हे एक १०० घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव. गावात शेतकरी व शेतमजूरांची वस्ती, दोन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचे दिसून येत आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याची ओरड मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.
जैतापूरला जाण्यासाठी भोयेगाव ते जैतापूर व नांदगाव (सूर्या) ते जैतापूर असे दोन रस्ते आहेत. परंतु या दोन्ही रस्ते अजूनही कच्चेस आहेत. रस्त्याची नेहमीच फक्त दुरुस्ती केली जाते. तीही काळी माती व दगड टाकून. परंतु या दोन्ही रस्त्याचे पक्के बांधकाम किंवा डांबरीकरणासाठी मात्र येथील नागरिक अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत.
गावातून कोणत्याही कामासाठी बाहेरगावी जाणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते. बाजार असो, शेतातील माल विक्रीसाठी असो, शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे असो किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रत्येकवेळी रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागते. विद्यार्थ्यांना तीन किमीचा प्रवास पायदळ करावा लागत असून गावात प्रवासासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. मागील वर्षी रस्त्याच्या दुरुस्ती कामाची तक्रार केल्यानंतर कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले. परंतु कोणतीही मोठी कार्यवाही होऊन रस्त्याची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही. ही स्थिती कायम आहे.

जैतापूर हे नांदगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असल्यामुळे विविध कागदपत्रांसाठी नांदगावला जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी सोईचा रस्ता नसल्यामुळे प्रवासी वाहतूक होत नाही. नाईलाजाने पायदळ जावे लागते. लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची समस्या सोडवावी.
- वंदना बेरड, सदस्य, ग्रा.पं.जैतापूर.

Web Title: Jaitapur residents walk through the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.