जननायक बिरसा मुंडा पुतळा उभारणीचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:32 AM2021-09-04T04:32:58+5:302021-09-04T04:32:58+5:30

आमसभेत महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, आयुक्त राजेश मोहिते आदी उपस्थित होते. ...

Jananayaka Birsa Munda statue erection spree | जननायक बिरसा मुंडा पुतळा उभारणीचा तिढा सुटला

जननायक बिरसा मुंडा पुतळा उभारणीचा तिढा सुटला

Next

आमसभेत महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, आयुक्त राजेश मोहिते आदी उपस्थित होते. जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासह पुतळा उभारणीसाठी ठराव घ्यावा, अशी मागणी आदिवासी समाजबांधवांसह नगरसेविका शीतल आत्राम, शीतल कुळमेथे, ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम, माया उईके यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याकडे केली होती. मनपाने चंद्रपूर शहरातील मोहल्ला जटपुरा- १, शीट नं. २३, नगर भूमापन क्र. २३३६ पैकी (मालमत्ता पत्रकानुसार) क्षेत्र ५४.०० चौमी. भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शासकीय जागा सौंदर्यीकरण, देखभाल करण्यासाठी विनामूल्य महानगरपालिकेला हस्तांतरित करून देण्याबाबत प्रस्ताव प्रपत्र भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘स’मध्ये जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे १९ मार्च, २०२१ रोजी सादर केला होता. या जागेवर सौंदर्यीकरण प्रस्तावित करणे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचा विषय २३ जून, २०२१च्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यावेळी सौंदर्यीकरण करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. आता ३१ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत पुतळा उभारणीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Jananayaka Birsa Munda statue erection spree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.