मोहुर्ली येथे जनजागरण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:09 PM2018-02-26T23:09:31+5:302018-02-26T23:09:31+5:30
जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोहुर्ली पर्यटन संकुल येथे शुक्रवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोहुर्ली पर्यटन संकुल येथे शुक्रवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली.
मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, पोलीस उपअधीक्षक बजरंग देसाई, अंगणवाडी पर्यवेक्षिका शिला जुमडे, आदिवासी विकास निरीक्षक डी. एस. पडगलेवार, मंडळ अधिकारी रमेश आवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. ए. राऊत यांची उपस्थिती होती.
या मेळव्यात जि.प. उच्च प्राथमिक शाळा मोहुर्ली, संत गाडगेबाबा विद्यालय मोहुर्ली, स्वराज्य जागृती समिती ताडाळी यांनी स्वागत गीत, आदिवासी नृत्य, दारू बंदीवर पथनाट्य तसेच संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त स्वच्छतेवर सादरीकरण करण्यात आले. तसेच पोलीस बँड पथकातर्फे राष्टÑगीतावर जनजागृती करण्यात आली. सायबर सेलतर्फे सायबर गुन्ह्याबाबत, महिलावर होणाºया अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार बाबत, वाहतुक नियमांसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्या दरम्यान महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, बाल कल्याण विभाग व पोलीस विभागातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
मेळाव्यामध्ये मोहुर्ली प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना लगोरी व स्किपींग, व्हॉलीबॉल व किट तसेच ग्राम जुनोना येथील क्रिकेट टिमला क्रिकेट किट, पोलीस भरतीचे पूर्व तयारी करणाºया मुलांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले. तसेच मोहुर्ली आणि जुनोना येथील पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.