गणेशभक्तांना जास्वंदाचे रोपटे व प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:21+5:302021-09-13T04:26:21+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी विसर्जनकुंड ...
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी विसर्जनकुंड लावण्यात आले आहे. या विसर्जनकुंडात श्रींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रामाळा तलाव येथे महापौर राखी संजय कंचर्लावार व स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या हस्ते पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मनपा प्रशासनातर्फे झोननिहाय विविध चौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी कृत्रिम विसर्जनकुंड व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करून कृत्रिम विसर्जनकुंडात मूर्ती विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांना मनपाच्या उद्यान विभागाच्या वतीने जास्वदांचे रोपटे भेट दिले जात आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना महापौर राखी संजय कंचर्लावार व स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या हस्ते जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वच्छता विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांची उपस्थिती होती.