जटपुरा गेटवर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:18 PM2018-02-26T23:18:35+5:302018-02-26T23:18:58+5:30

जटपुरा गेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता बेजार झाली आहे. अनेक वर्षांपासून जनतेची ही समस्या आहे. ती सोडविणे सोडून दोन कोटींचा खर्च करीत जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आधी वाहतूक कोंडी सोडवा; नंतरच सौंदर्यीकरण करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जटपुरा गेटवर सोमवारी धरणे देण्यात आले.

Jatpura Gate on the Movement | जटपुरा गेटवर धरणे आंदोलन

जटपुरा गेटवर धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देशिवसेना : आधी कोंडी सोडवा; नंतर सौंदर्यीकरण करा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जटपुरा गेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता बेजार झाली आहे. अनेक वर्षांपासून जनतेची ही समस्या आहे. ती सोडविणे सोडून दोन कोटींचा खर्च करीत जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आधी वाहतूक कोंडी सोडवा; नंतरच सौंदर्यीकरण करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जटपुरा गेटवर सोमवारी धरणे देण्यात आले.
सदर आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. धरणे आंदोलनात माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर, दीपक बेले, शहर प्रमुख सुरेश पचारे, जिल्हाप्रमुख भारती दुधानी, माजी नगरसेवक आकाश साखरकर, राजेश नायडू, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, नगरसेवक विशाल निंबाळकर, कलाकार मल्लारप, संदीप कष्टी, अब्बासभाई, इरफान शेख, अजय कोंडलेवार, चिराग नथवानी, प्रकाश चंदनखेडे, चंद्रराज बाथो, विलास वनकर, दीपक पद्म्गिरीवार, रुपेश पांडे, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, शंकर दंतूलवार, राशीद हुसैन, दिलीप बेंडले, वैभव माकडे, गौरव जोरगेवार, टिकाराम गावंडे, बबलु पुण्यवर्धन, मंगेश अहीरकर, बादल हजारे, मुकेश डाखोरे, राजेश मांगूळकर, प्रितम लोणकर, माला तुरारे, सुजाता बल्ली, महादेव अडबाले, राहुल मोहुर्ले, इरफान शेख आदींची सहभागी झाले होते. दिवसभर धरणे दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही उपायही निवेदनातून सूचविण्यात आले आहे.
जनतेच्या संयमाची थट्टा करू नये - जोरगेवार
जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी ही चंद्रपूरकरांची मोठी समस्या आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या समस्येतून मार्ग काढण्यापेक्षा येथे सौंदर्यीकरणाची गरज लोकप्रतिनींधींना अधिक वाटणे हे जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. दररोज त्रास होत असतानाही जनतेने संयम पाळला आहे. या संयमाची थट्टा करून नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असे किशोर जोरगेवार यावेळी मोर्चेकरांना संबोधित करताना म्हणाले.

Web Title: Jatpura Gate on the Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.