जेसीआयने केला विविध क्षेत्रातील २१ जणांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:32 AM2021-09-17T04:32:45+5:302021-09-17T04:32:45+5:30

चंद्रपूर : जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारा राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील विविध क्षेत्रातील व विविध अस्थापनेतील २१ जणांची ...

JCI felicitates 21 people from various fields | जेसीआयने केला विविध क्षेत्रातील २१ जणांचा सत्कार

जेसीआयने केला विविध क्षेत्रातील २१ जणांचा सत्कार

Next

चंद्रपूर : जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारा राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील विविध क्षेत्रातील व विविध अस्थापनेतील २१ जणांची निवड करून त्यांचा बल्लारपूर येथे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी नरेंद्र बर्डिया, भरत बजाज, सुषमा शुक्ला, स्मृती व्यवहारे, जयश्री शेंडे, सुशिला पोरेड्डीवार, मंजू गौतम, मधुस्मिता पाढी, रितू पानथरे, डॉ. मनीषा पाटणक, रेखा बोढे आदी उपस्थित होते. नरेंद्र काकडे, जितेंद्र देशकर, कृष्णदत्त जगदेवप्रसाद शुक्ला यांनी सहकार्य केले. संचालन मंजू गौतम, स्वतंत्र कुमार शुक्ला, मधुस्मिता पाढी तसेच आभार सुशीला पुरेड्डीवार यांनी मानले.

बाॅक्स

यांचा झाला सत्कार

जि. प. प्राथमिक शाळा मायकलपूर डॉ. सुधाकर जगन्नाथ मडावी, जि. प. शाळा पालडोह राजेंद्र परतेकी, जि. प. उच्च प्राथमिक शाळा हरदोना येथील सहायक शिक्षक गिरिधर गुणवंत पानघाटे, बी. आर. सी. राजुराचे विषय तज्ज्ञ मुसा शेख, जि.प. उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील मंगला उरकुडे, जि. प. शाळा सेवानगर येथील अली अजानी, जोतिबा विद्यालय राजुरा येथील राजू डाहुले, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूरचे प्रा. प्रफुल माहुरे, योग शिक्षिका व योग्यप्रवृत्तिका ज्योती देऊरकर, शिक्षण प्रेमी व विशाल शेंडे, जि,प. उच्च प्राथमिक शाळा सुब्बई येथील रश्मी पिंपळकर, जि. प. शाळा बिबी येथील अनंता रासेकर, इन्फंट जिसस कॉन्व्हेंट स्कूल राजुरा येथील मेघा धोटे, राजुराचे उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक प्रकाश पचारे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा कान्हाळगाव येथील प्रभारी मुख्याध्यापिका पुष्पा सोयाम-मस्के, नगर परिषद राजुरा येथील केंद्रप्रमुख बंडू ताजने, शिक्षणप्रेमी व शिक्षण प्रवर्तक हर्दोना येथील अक्षय टेकाम, स्टेला मेरिस स्कूल राजुरा येथील क्रीडा शिक्षक भास्कर फरकाडे, जि. प. प्राथमिक शाळा जेवरा येथील बंडू ताजणे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा भुरकुंडा (बु) येथील धनराज दुर्योधन आणि शिक्षण प्रेमी व शिक्षण प्रसारक अभिलाशा बोबडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: JCI felicitates 21 people from various fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.