दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी झुंबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:09 PM2018-11-05T22:09:20+5:302018-11-05T22:09:50+5:30

वर्षभरात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीसाठी चंद्रपूरची बाजारपेठ सजली असून मागील दोन दिवसांपासून विविध वस्तुंच्या खरेदीला वेग आल्याने बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे.

Jhumpi for the purchase of Diwali literature | दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी झुंबळ

दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी झुंबळ

Next
ठळक मुद्देचंद्रपुरातील बाजारपेठ सजली : रस्त्यावर तोबा गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्षभरात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीसाठी चंद्रपूरची बाजारपेठ सजली असून मागील दोन दिवसांपासून विविध वस्तुंच्या खरेदीला वेग आल्याने बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चंद्रपुरात दिवाळी मोठ्या आनंदोत्सवात साजरी करण्यात येत असते. या सणानिमित्त नवीन कपडे, दागिणे, अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तूची खरेदी करण्यात येत असते. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने सजवली असून मोठ्या प्रमाणात रोषणाई केली आहे. सोमवारी शहरातील कपडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सुट दिली असल्याने कापड दुकानात दिवसभर रेलचेल आढळून आली. त्यासोबतच शहरातील धान्य व किराणा दुकानांतही आज बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळाली.यासह टिव्ही, फ्रीज, इलेक्ट्रानिक वस्तूची दुकाने सजली आहेत. विद्युत रोषणाईसाठी आकाशकंदील, लाईटींग, सजावटीचे साहित्यांनी बाजार फुलला आहे. दिवाळी सणात लागणारे फराळाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत असून रेडिमेट फराळ खरेदीचे प्रमाण वाढत आहे. यासोबतच मातीचे दिवे, आकाशकंदील लक्ष्मीपूजनासाठी लागणारी पुजेचे साहित्य तसेच लक्ष्मीच्या मृती व फोटो विक्रीची दुकानेसुद्धा लागली आहेत.
फटाक्याच्या किंमतीत वाढ
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येत असतात. त्यामुळे शहरातील जेल परिसराच्या मागे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने सजली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची फटाके उपलब्ध आहेत. त्यामध्ये लहान मुलांसाठी पॉप-पॉप, फुलझडी, साप गोळी, अनार, झाड, लवंगे, लक्ष्मी बॉम्ब यासारखे विविध प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध असून मागील वर्षीपेक्षा यावर्षी एक टक्कयाने फटाक्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावर्षी आकाशकंदिलला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे फटाका विक्रेत्यांनी सांगितले.
आॅनलाईने शॉपिंगमुळे फटका
आजचे युग झपाट्याने स्मार्ट होत आहे. त्यामुळे ग्राहक आता घरुनच आॅनलाईन खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी वेगवेगळ्या साईट्स तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सवलत देत असल्याने दिवसेंदिवस आॅनलाईन खरेदीमध्ये वाढ होत आहे.
सराफा दुकानामध्ये प्रचंड गर्दी
धनतरसच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे शहरातील सराफा दुकानाची मोठ्या प्रमाणात सजावट केली असून ग्राहकही मोठ्या आनंदाने सोने चांदीची दागिणे खरेदी करीत होते. सोमवारी शहरातील सराफा दुकानामध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.

Web Title: Jhumpi for the purchase of Diwali literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.