जिवती तालुका तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:50 AM2019-05-15T00:50:43+5:302019-05-15T00:51:08+5:30

सततच्या दृष्काळी परीस्थितीमुळे पहाडावरील अर्ध्याअधिक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. परिसरातील नदी, नाले व जलस्त्रोतही पूर्णत: आटले असून नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने केवळ मलमपट्टी केली आहे.

Jivati taluka was thirsty | जिवती तालुका तहानलेलाच

जिवती तालुका तहानलेलाच

Next
ठळक मुद्देजीपीएस रिडींगविना चालतात टँंकर

शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : सततच्या दृष्काळी परीस्थितीमुळे पहाडावरील अर्ध्याअधिक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. परिसरातील नदी, नाले व जलस्त्रोतही पूर्णत: आटले असून नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने केवळ मलमपट्टी केली आहे. घनपठार, बुद्धगुडा व हिमायतनगर या तीन गावांत माणिकगढ सिमेंट कंपनीच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करुन येथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र तेही पाणी अपुरे असल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती पाचविला पुजलेली आहे.
फेब्रुवारीपासूनच सुरू आहे टंचाई
पहाडावरील अनके गावांत फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. त्यासाठी टंचाईग्रस्त गावातील योजना पूर्ण करणे, संबंधित योजनेला पूरक करणे, योजनेची विशेष दुरुस्ती करणे, वापरात असणाऱ्या विंधन विहिरी दुरुस्त करणे, स्थानिक विहिरी, बोरवेल अधिग्रहण करुन नागरिकांची तहान भागविण्याची गरज असतानाही प्रशासनाने मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्याचेच काम केले आहे.

अकराशे पन्नास लोकसंख्या असलेल्या राहपल्ली(खु.) ग्रा.पं.मधील हिमायतनगर गावात पाण्याचे स्त्रोत पूर्णत: आटले आहे. केवळ एकच टँकर गावात येत. त्यानंतर टँकर विहिरीत सोडल्यानंतर नागरिक पाणी भरतात. अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यात नेहमीच पाणी टंचाई असते. आजही ती कायम आहे, असे असले तरी स्थानिक प्रशासन मात्र डोळे मिटून बघ्याची भूमिका घेत आहेत. शासनाने प्रत्येक गावांतील नागरिकाला मुबलक पाणी मिळावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या.मात्र त्या कागदावर आहे.

Web Title: Jivati taluka was thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.