जिवती येथे संयुक्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:40+5:302021-08-21T04:32:40+5:30
या बैठकीत नागपूर येथे झालेले आंदोलन आणि २६ ऑगस्टला स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी होणाऱ्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाविषयी सविस्तर चर्चा ...
या बैठकीत नागपूर येथे झालेले आंदोलन आणि २६ ऑगस्टला स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी होणाऱ्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिवती तालुका शेतकरी संघटना युवा आघाडीच्या अध्यक्षपदी रामेश्वर नामपल्ले आणि शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्षपदावर गणेश कदम यांची निवड करण्यात आली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तालुकाध्यक्ष पदावर सुनील राठोड, जिवती शहर अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष अफजल पठाण, तालुका सहसचिव मारोती रिगंट, धोंडामांडवा गावप्रमुख किरण रिगंट, उपाध्यक्ष सचिन सलगर, कुंभेझरी गावप्रमुख श्रीनिवास वाघमारे, जिवती दक्षता समिती सदस्य सुखदेव जाधव यांची निवड बैठकीत करण्यात आली. बैठकीला माजी आमदार ॲड.वामनराव चटप उपस्थित होते.