पत्रकारिता समाजाचा आरसा आहे
By admin | Published: January 10, 2017 12:49 AM2017-01-10T00:49:02+5:302017-01-10T00:49:02+5:30
पत्रकारितेच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची रेलचेल आहे. तरीही मुद्रीत साहित्यातील वर्तमान पत्राचे महत्त्व कमी झाले नाही.
हरीश शर्मा : बल्लारपुरात मान्यवरांचा सत्कार समारंभ
बल्लारपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची रेलचेल आहे. तरीही मुद्रीत साहित्यातील वर्तमान पत्राचे महत्त्व कमी झाले नाही. वाचक वर्ग वर्तमानपत्रातील बातम्यावर विश्वास ठेवून आहे. पत्रकारांनी विकासात्मक व समाजाभिमुख लेखन करणे अपेक्षित आहे. पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे समाजाचा आरसा आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा यांनी शुक्रवारी येथे केले.
बल्लारपूर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्यसाधून स्थानिक श्री संत तुकाराम महाराज सभागृहात चित्र रंगभरण स्पर्धा, सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण, राजकीय व शासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शर्मा बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र आर्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन जुनोनकर, प्रसिद्ध लेखक आशिष देव, सत्कारमुर्ती माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, कवी मनोज बोबडे, सामाजिक कार्यकर्ता आलोक साळवे यांंची उपस्थिती होती.
यावेळी आशिष देव म्हणाले, आज घडीला पत्रकारितेच्या क्षेत्रात बदल घडत आहेत. नकारात्मक व सकारात्मक बातम्यात टष्ट्वंवटष्ट्वंव सुरू असल्याचे दिसून येते. एकच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळी प्रकाशित केली जाते. तरीही वर्तमानपत्र इतर माध्यमापेक्षा श्रेष्ठ असून विश्वहार्यता जोपासून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अनेकश्वर मेश्राम यांनी केले. संचालन प्रा. विजय सोरते यांनी तर आभार पद्माकर पांढरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय रासेकर, प्रशांत वैरागडे, रमेश निषाद, सुजय वाघमारे, विकास राजूरकर, प्रशांत रणदिवे, प्रशांत विघ्नेश्वर, अॅड. संजय बोराडे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
यांना करण्यात आले सम्मानित
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे, शासकीय क्षेत्रातील मुख्याधिकारी विपीन मुद्धा, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, साहित्य क्षेत्रातील मनोज बोबडे, सामाजिक कार्यासाठी आलोक साळवे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे आस्था गार्जलावार, चंदनकुमार शाह या विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुखमीत कौर, प्राचार्य भावना वेणू गोपाल, प्राचार्य पी. संतोषकुमार, कविता कंडे, रजिया खान, स्वाती बाबुळकर, सुरेखा चंदेल, डी.एल. जांभुळे, उज्वला येरमे, शितल वाघमारे, फरदाना कुरेशी, दीपाली चिवंडे, शैलेस येरणे, शिल्पा टिपले, रजनी वाळके यांचाही सत्कार करण्यात आला.