हर हर महादेव...च्या गजरात जुगाद निनादले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:40 PM2018-02-13T23:40:03+5:302018-02-13T23:40:38+5:30

येथून जवळच असलेल्या जुगाद मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच शिवभक्तांनी हजेरी लावून शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेवचा गजर केल्याने परिसर निनादून गेला होता.

Jugad Ninaadale in every song of Har Har Mahadev ... | हर हर महादेव...च्या गजरात जुगाद निनादले

हर हर महादेव...च्या गजरात जुगाद निनादले

Next
ठळक मुद्देयात्रेला सुरुवात : शेकडो भाविकांंचे जत्थे दाखल, यात्रा बसगाड्यांची सोय

आॅनलाईन लोकमत
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या जुगाद मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच शिवभक्तांनी हजेरी लावून शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेवचा गजर केल्याने परिसर निनादून गेला होता.
पहाटे उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांनी सपत्नीक मंदिराच्या भूगर्भात असलेल्या शिवलिंगाचे महाअभिषेक करून विधिवत पूजाअर्चा केली. व्यंकट गिरी, माजी सरपंच सुधाकर बोबडे यांच्यासह जुगाद येथील प्रतिष्ठित आणि शिवभक्तांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यात्रेसाठी येथील पंचक्रोशीतीलच नव्हे तर विदर्भातील शेकडो भाविकांनी येथे येवून शिवलिंगाचे दर्शन घेतले. दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व वणीचे आ. संजय रेड्डी बोंदकुरवार यांनी मंदिराला भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले.
आ. बोंदकुरवार यांनी या मंदिर परिसरात रस्ते, शौचालय व अन्य सोयी उपलब्ध करण्याकरिता २५ लाखांचे कामे केली. तर उर्वरित बांधकामाकरीता १० लाख रुपये मंजूर केल्याची माहिती माजी सरपंच सुधाकर बोबडे यांनी दिली. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने ना. हंसराज अहीर व आ. संजय रेड्डी बोंदकुरवार यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची व्यवस्था करण्यात आली असून यावर्षी येथे येणाºया भक्तांची संख्या वाढली आहे.
पेरजागडवर उसळला भाविकांचा जनसागर
तळोधी (बा) : येथून सात किमी अंतरावर असलेल्या सातबहिणी पेरजागड येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारपासून यात्रेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्त शेकडो भाविकांचे जत्थे येथे दाखल झाले आहेत. हर हर महादेवचा गजर करित भाविक दर्शन घेत असून येथे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. बाल कीर्तनकार जान्हवी घुमेचे प्रवचन आयोजित करण्यात आले असून नेत्र तपासणी शिबिर, प्रजापती ब्रह्मकुमारी पाठशालाचे शिबिर येथे घेण्यात येत आहे. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ठाणेदार श्रीकांत पांढरे यांच्या नेतृत्वात पीएसआय जितेंद्र ठाकूर यांनी चोख बंदोबस्त लावला आहे. स्वयंपाकासाठी झाडांची कत्तल होवू नये म्हणून वनविभागाचे कर्मचारीही यात्रेदरम्यान नजर ठेवून आहेत.
सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा
राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी रांगा पाहायला मिळाल्या. परिसरातील अनेक भाविक येथील दर्शनासाठी दाखल झाले असून हर हर महादेवरा गजर परिसरात निनादला आहे. येथे विविध मंडळातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Web Title: Jugad Ninaadale in every song of Har Har Mahadev ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.