भद्रावती परिसरात नकली दारु विक्रीचा व्यवसाय जोमात
By admin | Published: February 4, 2017 12:42 AM2017-02-04T00:42:12+5:302017-02-04T00:42:12+5:30
समाजहित व तळीरामांचे आरोग्य लक्षात घेत एकीकडे महाराष्ट्र शासनाने आपला राजस्व बुडवून जिल्ह्यात दारुबंदी केली असली तरी ...
दोन प्रकारची दारूविक्री : मद्यपी करताहेत दामदुपटीने खरेदी
आयुध निर्माणी (भद्रावती) : समाजहित व तळीरामांचे आरोग्य लक्षात घेत एकीकडे महाराष्ट्र शासनाने आपला राजस्व बुडवून जिल्ह्यात दारुबंदी केली असली तरी दुसरीकडे या दारुबंदी झालेल्या भद्रावती परिसरात नकली दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मद्यपींचे जीवन धोक्यात आले आहे. या अवैध नकली दारु पुरवठ्यामुळे शासनाचा उदात्त हेतू मागे पडत असल्याने या नकली अवैध दारुवर प्रतिबंध लावण्याची मागणी होत आहे.
दारुबंदीपूर्वी बारमध्ये जाऊन दारु घेतली जायची. परंतु बंदीनंतर पाहिजे तिथे व पाहिजे तेवढी दारु मिळत आहे. भद्रावती परिसरात विकल्या जाणारी दारु नकली स्वरुपात असल्याची चर्चा आहे. अवैधपणे दारु विकत घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. असली इंग्रजी दारु समजून खरेदी करताहेत करण्यात येणारी दारू इंग्रजी दारुच्या बाटलीमध्ये नकली दारु भरण्यात येत आहे. ती असली असल्याचे भासवले जात आहे. या परिसरात दोन प्रकारची दारु मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचे कळते. एक एम.डी. नंबर वन आणि ओ.सी. डब्ल्यू. या सर्व दारु ओरीजनल बॉटलमध्ये डुप्लिकेत असल्याचे कळते. दारु नकली की, असली आहे, हे ओळखण्याचे मद्यपींकडे कुठलेही विश्वासू तंत्र नाही. ते केवळ आपला शौक पूर्ण करण्याकरिता लपूनछपून दारु खरेदी करतात. ही दुय्यम प्रतीची दारु पिणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. नकली इंग्रजी दारु पिणाऱ्यांना पोटाचे आजार व छातीत जळजळ करीत असते. त्यांना मोठ्या प्रमाणात आजार जडल्याची चर्चा आहे. शासनाने दारुबंदी घोषित करून आपले कर्तव्य तर पार पाडले. पण त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी करणारी यंत्रणा व कमजोर इच्छाशक्ती यामुळे तळीराम नकली दारुवर ताव मारीत नशेचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
दारु पिल्यामुळे पोटाचे आतडे, लिव्हर व स्वादुपिंडाचे आजार होतात. परंतु पूर्वी २० -२५ वर्षी अतिरेकी प्रमाणात दारु प्राशन केल्यावर तळीरामांच्या आरोग्यावर जे विपरित परिणाम व्हायचे. तेवढे परिणाम दारुबंदीनंतर दीड-दोन वर्षात दिसायला लागले ़आहेत.
-डॉ. विवेक शिंदे,
भद्रावती