जंगलातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:40 PM2018-03-30T23:40:37+5:302018-03-30T23:40:37+5:30

मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे.

The junk food dryers; Wildlife wandering | जंगलातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची भटकंती

जंगलातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाची उदासीनता : पाण्यासाठी भटकणाऱ्या चार रानटी डुकरांचा गेला बळी

सुरेश रंगारी।
आॅनलाईन लोकमत
कोठारी : मार्च महिन्याच्या प्रारंभीच कडाक्याचे ऊन्ह पडू लागले होते. आता तापमानात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मानवासह वन्यप्राणी व पक्षांची लाही लाही होताना दिसून येत आहे. जंगलातील पाणवठे, नाले व बंधारे कोरडे पडण्यास सुरूवात झाली असून पाण्यासाठी वन्यप्राणी, पक्षी भटंकती करीत आहेत. कोठारी, तोहोगाव रस्त्यावर असेच पाण्यासाठी भटकणाºया चार रानटी डुकरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यामुळे वनविभागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोठारी, झरण, तोहोगाव, कन्हारगाव व धाबा वनपरिक्षेत्रात पानवठे, बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील पाणी आटले असून नैसर्गिक नाल्यातही पाण्याचे अत्यल्प प्रमाण आहे. मानवनिर्मित कृत्रिम पानवठ्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी पाणी साठविल्या जात होते. आता त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भ्रमंती करीत पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेताना दिसून येत आहेत. मात्र जंगलातील नालेही कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची मोठी गैरसोय होत आहे. वनविभागाने जंगलात सिमेंट बंधारे, गॅबीन बंधारे बांधले आहेत. मात्र चुकीच्या ठिकाणी व निकृष्ट बंधारे बांधण्यात आल्याने त्यात पाणी जमा होत नाही. उलट शेकडो बंधारे, पानवठे निकामी झाले आहेत. यासाठी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी उधळला गेला आहे. वन्यप्राण्यांसाठी पाण्यासाठी जंगलातून गावाच्या दिशेने धाव घेत असताना रस्ता ओलांडताना अपघात होवून जीव जात आहेत.
जंगलात वनविकास महामंडळ व वनविभागाकडून अनेक पानवठे तयार करण्यात आले असून त्याच्या शेजारी लाखो रुपये खर्चून कुपनलिका व सौर उर्जेवर चालणारे संयंत्र बसविण्यात आले. त्याचे पाणी पानवठ्यात सोडण्याची सोय करण्यात आली. मात्र ते सर्व बंद असून त्याचे साहित्य चोरीला गेले आहे. त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने त्याद्वारे पानवठ्यात पाणी पोहचू शकत नाही. परिणामी शासनाचा त्यावरील निधी व्यर्थ गेला असून वनाधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे वन्यप्राणी पाण्यावाचून जीव गमावत आहेत.
जंगलातील कोरड्या पानवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था वनाधिकाऱ्यांनी करावी. तसेच नादुरुस्त पानवठे, बंधारे, सौर उर्जा पंप याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: The junk food dryers; Wildlife wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.