जातनिहाय जनगणनेतूनच ओबीसींना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:23+5:30
रविवारी स्थानिक स्वागत मंगल कार्यालयात ओबीसी जनगणना परिषद घेण्यात आली. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी परिषदेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे अॅड. अभिजीत वंजारी (नागपूर), सुरेश ब्राह्मणकर (लाखांदूर) व अन्य मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्राचे प्रास्ताविक अॅड. गोविंद भेंडारकर तर संचालन प्रा.बालाजी दमकोडवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावे, ओबीसींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे आणि शेकडो वर्षांचा अन्याय दूर व्हावा, यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना अत्यावश्यक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने हा प्रश्न तातडीने मान्य करण्याची मागणी कार्यकर्ते व अभ्यासकांनी ओबीसी जनगणना परिषदेत केली.
रविवारी स्थानिक स्वागत मंगल कार्यालयात ओबीसी जनगणना परिषद घेण्यात आली. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी परिषदेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे अॅड. अभिजीत वंजारी (नागपूर), सुरेश ब्राह्मणकर (लाखांदूर) व अन्य मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्राचे प्रास्ताविक अॅड. गोविंद भेंडारकर तर संचालन प्रा.बालाजी दमकोडवार यांनी केले. दुसऱ्या सत्रात ओबीसी प्रश्नांवर खुली चर्चा झाली. प्रा. नामदेव जेंगठे, प्रा.प्रकाश बागमारे, रूचित वांढरे, सचिन राजूरकर, मोंटू पिलारे, वामन नागोसे आदींनी विचार मांडले. ओबीसींना संवैधानिक अधिकार मिळावे, यासाठी व्यापक लढ्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. संचालन मुनिराज कुथे यांनी केले. दोन्ही सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य नामदेव कोकोडे यांनी भूषविले. त्यांनी ओबीसींच्या समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. कार्यक्रम समन्वयक भाऊराव राऊत यांनी ओबीसींच्या हितासाठी विविध मागण्यांचा ठराव मांडला. परिषदेला बहुसंख्य ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. आभार सोपानदेव पडोळे यांनी मानले. राष्ट्रगीताने परिषदेची सांगता झाली. आयोजनासाठी अरविंद नागोसे, नीलकंठ दुणेदार, योगेश नंदनवार, निकेश तोंडरे, धनु राऊत, प्रा. मोतीलाल दर्वे, मकरंद राखडे, ओमप्रकाश बगमारे, ओबीसी कर्मचारी संघटनेचे केवळ मैंद, रवी पिलारे आदींनी सहकार्य केले.
परिषदेत पाच ठराव पारित
२०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोग व नचीपण आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकरी व ओबीसींच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे आमदार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल या परिषदेत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.