कबड्डी खेळाडूंना सहकार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:10 AM2017-12-16T00:10:21+5:302017-12-16T00:10:42+5:30

कबड्डी महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. आजही ग्रामीण भागात कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी भारतीय संघात प्रतिनिधित्व करावे.

Kabaddi players will cooperate | कबड्डी खेळाडूंना सहकार्य करणार

कबड्डी खेळाडूंना सहकार्य करणार

Next
ठळक मुद्देएकनाथ शिंदे : विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

आॅनलाईन लोकमत
वरोरा : कबड्डी महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. आजही ग्रामीण भागात कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी भारतीय संघात प्रतिनिधित्व करावे. राज्य सरकार या कबड्डी खेळाडूंना सहकार्य करणार, अशी ग्वाही राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली़ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़
वरोरा शहरात स्व. प्रा. उत्तम मेश्राम स्टेडीयम कॉटन मार्केटमध्ये स्व. सुनील धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयहिंद क्रीडा व्यायाम प्रसारक मंडळ आणि आमदार बाळू धानोरकर यांच्या पुढाकाराने विदर्भस्तरीय पुरुष व महिलांच्या कबड्डी स्पर्धा सुरू आहे़
उद्घाटन सोहळ्याला राजापुरा येथील आमदार राजन साळवी, आळंदीचे आमदार सुरेश गोरे, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, युवा सेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, महिला आघाडी संघटीका रोगे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सोहेल, वाहतूक जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, वणीचे संजय देरकर, सुनील कातखेडे, वरोरा बाजार समिती सभापती विशाल बदखल, उपसभापती राजू चिकटे, न.प. गटनेता गजानन मेश्राम,नगरसेवक राजू महाराज आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते़
ना़ शिंदे म्हणाले, राज्याने क्रीडा धोरण केले असून, ग्रामीण खेळाडूंना चालना देण्यासाठी विविध योजना सुरू आहेत़ अन्य खेळांप्रमाणेच कबड्डीला आज प्रतिष्ठा मिळाली़ या खेळासाठी क्रीडा संघटनांनी सहकार्य करावे़ स्वच्छ भारत अभियानात भद्रावती नगरपालिकेने देशात दुसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल नगराध्यक्ष धानोरकर व उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांचा ना. शिंदे यांनी सत्कार केला़
विदर्भात खेळाडू दाखल
वरोरा येथे सुरू झालेल्या विदर्भस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भातील नामांकित खेळाडू शहरात दाखल झाले आहेत़ युवक, युवती, महिला व प्रौढांकरीता क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याची परंपरा कायम असून, या स्पर्धेच्या निमित्ताने शहरात क्रीडाप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे़ उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन आरती रोडे यांनी केले़ वैदही खडसान यांनी गायलेल्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले़ प्रास्ताविक भाषधातून आमदार बाळू धानोरकर विविध उपक्रमांची माहिती दिली़ डॉ. सागर वझे यांनी आभार मानले. चार दिवस चालणाºया स्पर्धेत विदर्भातील पुरुषांचे ३५ आणि महिलांचे २० संघ सहभागी झाले आहेत. या संघामध्ये प्रो. कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेले प्रसिद्ध खेळाडू शशांक वानखेडे, शुभम पालकर, सारंग देशमुख आदींचाही समावेश आहे़ या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागातील क्रीडापे्रमी युवक गर्दी करीत आहेत़

Web Title: Kabaddi players will cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.