चंद्रपुरात काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:40 AM2019-05-15T00:40:28+5:302019-05-15T00:42:58+5:30

चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे.

Kalabazar at Chandrapur | चंद्रपुरात काळाबाजार

चंद्रपुरात काळाबाजार

Next
ठळक मुद्देनागरिकांना मिळेना पाणी : बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, या पाणी विक्रीचा कुठलाही रेकॉर्ड मनपाकडे सादर केला जात नाही. पावत्याही दिल्या जात नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाच्याच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या प्रकाराची पुष्टी लोकमतकडे केली आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. या नागरिकांना दररोज पाणी पुरविण्याची जबाबदारी उज्वल कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या इरई धरणात बºयापैकी पाणीसाठा आहे. असे असले तरी चंद्रपूरकरांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. शहरातील अनेक वार्डात पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. बाबुपेठ बंगाली कॅम्प, हिंग्लाज भवानी वार्ड, अष्टभुजा वार्ड, वडगाव, तुकूम तलाव, सुमित्रा नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, पठाणपुरा, रहमननगर, घुटकाळा, संजय नगर, क्रीष्णा नगर वॉर्डात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिक वणवण भटकत आहेत, नळ कनेक्शन असतानाही पाणी मिळत नाही. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदार पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून बांधकामधारकांना, बांधकाम कंत्राटदारांना पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, पाणी विकून पैसे घेताना पावतीही दिली जात नसल्याची माहिती आहे. एकूणच हा पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आणि कंत्राटदारांना पाणी विकणे, असा गोरखधंदा ऐन टंचाईच्या काळात सुरु आहे.
लग्नासाठी ५०० तर इतर कामांसाठी हजार रुपये दर
काही वार्डातील नागरिकांना मनपाकडून नि:शुल्क पाणी दिले जात असले तरी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमासाठी मनपाकडून पैशाने पाण्याचे टँकर पुरविले जातात. त्याच्या रितसर पावत्या देऊन मनपाकडे रेकॉर्ड ठेवला जातो. लग्न सोहठ्यासाठी ५०० तर इतर कार्यक्रमासाठी हजार रुपये मोजावे लागत आहे.
जीपीएस यंत्रणा नाही
पाण्याचे टँकर दिवसभर कुठे जातात, कुठे पाणी पुरविले जाते, याबाबतची माहिती असावी म्हणून टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाते. मात्र मनपाच्या सहाही टँकरमध्ये ही यंत्रणा ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली नाही. याबाबत अग्निशमन विभागातील अधिकाºयाला विचारले असता, आम्ही स्वत:च टँकरसोबत असतो. त्यामुळे आमचे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणून जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे सांगितले.
मनपाकडून दररोज ५० टँकर फेऱ्या
महानगरपालिकेकडे एकूण सहा टँकर आहे. सध्या शहरात तीव्र पाणी टंचाई असल्याने हे सहाही टँकर विविध वार्डात नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे. जिथे पाण्याची मागणी असेल तिथे टँकर पाठविला जात आहे. दररोज सहा टँकरच्या सुमारे ५० फेºया मारल्या जात आहे. मनापाकडून हे पाणी नि:शुल्क दिले जात आहे.

Web Title: Kalabazar at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.