कर्नाटक पॉवरने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:13+5:302021-02-16T04:30:13+5:30

भद्रावती : बरांज (मो) येथील ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन होते, या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीराख्यांना मताधिक्याने निवडून ...

Karnataka Power should do justice to the demands of the project victims | कर्नाटक पॉवरने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय द्यावा

कर्नाटक पॉवरने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय द्यावा

Next

भद्रावती : बरांज (मो) येथील ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन होते, या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीराख्यांना मताधिक्याने निवडून दिले आहे. ही या आंदोलनाच्या यशाची सुरुवात असून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पक्षाच्या ताकदीनिशी उभा राहीन, अशी ग्वाही माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

बरांज येथील नवनियुक्त सरपंच मनीषा प्रकाश ठेंगणे व उपसरपंच रमेश भंगू भुक्या यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अहीर यांनी केपीसीएल खाण कार्यस्थळीसुद्धा भेट देत कामाचे अवलोकन केले.

प्रसंगी गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला रणदिवे, वनिता भुक्या, प्रमिला आत्राम यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, पं. स. सभापती प्रवीण ठेंगणे, विजय वानखेडे, सुनील नामोजवार, प्रवीण सातपुते, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदीपे, अफझलभाई तसेच गावातील रमेश महाकुलकर, संजय ढाकणे, विजय रणदिवे, श्रीराम महाकुलकर, नीतेश बेलेकर, मनोहर बोढाले, संजय निखाडे, लक्ष्मण भुक्या, संजय सालूरकर आदी ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पुढे बोलतांना अहीर यांनी केपीसीएलने या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता त्वरित करावी, अन्यथा महाग पडेल असा तीव्र इशारा दिला.

Web Title: Karnataka Power should do justice to the demands of the project victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.