शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागाने टाकली कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:40+5:302021-08-28T04:31:40+5:30

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागामध्ये पूर्वी पुरेशा सोयी-सुविधा नव्हत्या. त्यामुळे गंभीर रुग्णांना नागपूर किंवा ...

Kat by the pediatric department of the government medical college | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागाने टाकली कात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागाने टाकली कात

Next

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागामध्ये पूर्वी पुरेशा सोयी-सुविधा नव्हत्या. त्यामुळे गंभीर रुग्णांना नागपूर किंवा इतरत्र हलवावे लागत होते. यामुळे बालरुग्णांच्या नातेवाइकांना नाहक त्रास होत होता. आता मात्र अतिदक्षता विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज झाला असून गंभीर बालरुग्णांवरही येथे उपचार होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या रुग्णांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी

येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यलायाची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णालयामध्ये बालरुग्ण विभागही आहे. मात्र आजपर्यंत येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री नव्हती. त्यामुळे अतिदक्षता विभाग नावालाच होता. गंभीर रुग्णांंवर उपचार होत नव्हते. परिणामी रुग्णांना नागपूरला उपचारासाठी घेऊन जावे लागत होते. यामध्ये आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. वैद्यकीय महाविद्यालय केवळ नावालाच असल्याचेही अनेक वेळा बोलल्या जात होते. दरम्यान, कोरोना संकटाची तिसरी लाट बालकांना धोकादायक असल्याचे बोलल्या जात आहे. ही लाट थोपविण्यासाठी तसेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील बालरुग्ण विभागाने अतिदक्षता विभागात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह बेडचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोरोनाच नाही तर इतरही गंभीर आजारावर येथे आता उपचार होणार आहे. या अतिदक्षता विभागाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी डाॅ. सुरपाम, डाॅ. जिवने, डाॅ. सोनारकर, डाॅ. नागमोते, डाॅ. फलके, डाॅ. हजारे यांची उपस्थिती होती.

बाॅक्स

बालरोग तज्ज्ञांची संख्या

तज्ज्ञ डाॅक्टर -०८

प्रशिक्षणार्थी-०७

बाॅक्स

दररोजचे रुग्ण (सरासरी)

ओपीडी-१००

भरती-२०-२५

बाॅक्स

तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट बालकांसाठी गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागाने संपूर्ण तयारी सुरू केली आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्यात आली असून प्रत्येक रुग्णांवर उपचार होतील, अशी तयारी सुरू करण्यात आली आहे.

बाॅक्स

काय आहे सुविधा

येथील बालरुग्ण विभागामध्ये

सद्यस्थितीत व्हेंटिलेटल्स, डीफ्रीबिलेट

एबीजी मशीन, मॅनिटर यासह अत्याधुनिक बेडचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.

कोट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात अतिदक्षता विभाग अत्याधुनिक मशीनने सज्ज झाला आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार होतील, अशा प्रत्येक यंत्रसामग्री आणण्यात आल्या आहे. संभाव्य कोरोनाची लाट थोपविण्यासाठी विभाग सज्ज आहे.

-डाॅ. निशिकांत टिपले बालरोग विभाग प्रमुख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

Web Title: Kat by the pediatric department of the government medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.