शारीरिक बदलांची शास्त्रीय माहिती ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:38 PM2018-03-30T23:38:05+5:302018-03-30T23:38:05+5:30

किशोरी व युवतींनी आपल्या शारीरिक बदलांची शास्त्रीय कोणतेही गैरसमज न ठेवता जाणून घेतली पाहिजे, असे मत अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी व्यक्त केले.

Keep scientific information about changes in physical condition | शारीरिक बदलांची शास्त्रीय माहिती ठेवावी

शारीरिक बदलांची शास्त्रीय माहिती ठेवावी

Next
ठळक मुद्देवर्षा जामदार : दृष्टी संस्थेतर्फे ‘बेटी करे सवाल‘ कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : किशोरी व युवतींनी आपल्या शारीरिक बदलांची शास्त्रीय कोणतेही गैरसमज न ठेवता जाणून घेतली पाहिजे, असे मत अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी व्यक्त केले. भवानजीभाई शाळेत दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे ‘बेटी करे सवाल’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महेशकर व मंचावर किरण बल्की, रोहिणी साखरकर, उषा मसादे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. जामदार म्हणाल्या, आरोग्य शास्त्राची माहिती घेवून निरोगी जीवन जगले पाहिजे. ज्ञान व विज्ञानामुळे नवे शोध लागले. त्यामुळे चुकीच्या पंरपरा टाळले पाहिजे. मुलींमध्ये शारीरिक बदलांसोबत मानसिक व भावनिक बदल होतात. या वयात चुका होण्याचा धोका असतो. किशोरी मुली व युवतींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होता. या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने १० वर्षांपासून जागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती उपाध्यक्षा अ‍ॅड. विद्या मसादे यांनी दिली. मुलींनी मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता आणि आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत सारिका बोराडे यांनी व्यक्त केले. शारीरिक बदलांविषयी प्रत्येक किशोरीने एकमेककांशी चर्चा केली पाहिजे. शिवाय, पौष्टीक आहार घ्यावा. कार्यशाळेत किरण बल्की, रोहिणी साखरकर, उषा मसादे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून सामाजिक विषयांची अतिशय सोप्या भाषेत मांडणी केली. शाळेतील विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून शरीरातील बदलांची माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक निमा लोहे यांनी संचालनशिक्षिका सहारकर यांनी केले. कहाडींगे यांनी आभार मानले केले. कार्यशाळेची सुरूवात स्वागत गीताने झाली.

Web Title: Keep scientific information about changes in physical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.