यशासाठी निरोगी जीवनाची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:07 PM2019-01-11T22:07:54+5:302019-01-11T22:08:11+5:30
सुयशासाठी प्रत्येक व्यक्ती व युवक-युवतीने निरोगी जीवनाची कास धरावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुयशासाठी प्रत्येक व्यक्ती व युवक-युवतीने निरोगी जीवनाची कास धरावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी रमेश मामीडवार, तर मंचावर सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, डॉ.कीर्तीवर्धन दीक्षीत, प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, रघुवीर अहीर, तालुका क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक, डॉ. विजय सोमकुंवर प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय खेळाडू धनश्री लेकुरवाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ना. अहीर यांनी बॅडमिंटन वुडन कोर्ट खासदार स्थानिक विकास निधी २०१७-१८ अंतर्गत बांधून देऊ, अशी घोषणा केली होती. त्याची पूर्तता पूर्ण करून त्यांनी विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिला. ना. अहीर म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक क्षमता उत्तम ठेवली पाहिजे. आजच्या तरूणाईने वाहने चालवत असताना एकदिवस तरी सायकलचा वापर करावा. यातून उत्तम व्यायाम होईल. अतिशय खडतर परिश्रम करून उत्कृष्ट खेळाडू व्हावे आणि आपल्या देशाचे नाव् उज्ज्वल करावे, असा संदेश ना. अहीर यांनी दिला. रमेश मामीडवार म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम सुरू आहेत. प्रशांत पोटदुखे यांनीही संस्थेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय केले, याची माहिती सादर केली. राष्ट्रीय, अखिल भारतीय, राज्यस्तरीय, गोंडवाना विद्यापीठातील विजेता संघातील गुणवंत खेळाडूंचा ट्रॅकसूट, खेळाचे शूज व ब्लेझर देऊन सत्कार करण्यात आला. खेळाडू धनश्री लेकुरवाळे यांनाही सन्मानित करण्यात आले.
वुडनकोर्ट खासदार विकास निधीतून बनवून दिल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मामीडवार यांच्या हस्ते ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.कुलदीप आर.गोंड यांनी केले. आभार डॉ.विजय सोमकुंवर यांनी मानले.