बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची केली ॲन्टिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:06+5:302021-05-12T04:29:06+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट ...

Kelly antigen check of outgoing citizens | बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची केली ॲन्टिजन तपासणी

बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची केली ॲन्टिजन तपासणी

Next

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र तरीही काही नागरिक याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली आहे. तपासणीअंती विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांचा अहवाल सकारात्मक आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत बल्लारपूर, राजुरा आणि चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी ही कारवाई केली जात आहे.

बल्लारपूर शहरातील मुख्य चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीची ॲन्टिजन तपासणी करण्यात येत आहे.

शहरात ही मोहीम तीन ठिकाणी राबविण्यात येत आहे.

बल्लारपूर शहरात सकाळी ११ वाजेपासून ५१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राजुरा शहरात पंचायत समिती चौकामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून एकाही व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आढळून आलेला नाही.

चिमूर शहरात बाजारपेठेलगत मुख्य रस्त्यावर ५० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना संशयित आढळल्यास त्याची तिथेच तपासणी केली जात आहे. त्यामुळे लक्षण नसलेले रुग्ण शोधण्यास मदत मिळत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून इतर लोकांना होणारी बाधा टाळू शकतो. पोलीस, आरोग्य विभाग व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Kelly antigen check of outgoing citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.