केरोसीनचा पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:51 PM2019-01-04T22:51:10+5:302019-01-04T22:51:29+5:30
जिल्ह्यातील बिगर गॅसधारकांना पीडीएसचे केरोसीन उपलब्ध करून देण्याच्या मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील बिगर गॅसधारकांना पीडीएसचे केरोसीन उपलब्ध करून देण्याच्या मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाच्या धोरणानुसार व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक व दोन सिलेंडर असलेल्या गॅसधारकांना केरोसीन देण्यात येवू नये, पीडीएसचे केरोसीन केवळ ज्या शिधापत्रकाधारकांकडे कुठलेही गॅसचे कनेक्शन नाही अशाच शिधापत्रकधारकांना उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रती कुटुंब चार लिटर दरमहा केरोसीन मिळावयास पाहिजे. त्यासाठी जिल्ह्याला पाच लाख २९ हजार १७६ लिटर केरोसिनचा पुरवठा आवश्यक आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यापैकी केवळ आठ तालुक्यांना ९६ हजार लिटर केरोसीन शासनाकडून मिळत आहे. परिणामी जिल्ह्यात केरोसीनसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यात केरोसीनची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, सिंदेवाही व कोरपना या तालुक्यामध्ये ४७ हजार ९८३ शिधापत्रकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. परंतु, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी डिसेंबर २०१८ करिता दिलेल्या केरोसीन नियतन करताना या सात तालुक्यांना शुन्य केरोसीन नियतन दिलेले आहे. जिल्ह्यातील या आठ तालुक्यात बिगर गॅसधारक शिधापत्रधारकांचा परितार्थ (स्वयंपाक) केरोसीनवर चालत आहे त्यांनी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक पुरवठा करण्याची मागणी काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना युवा नेते शिवाराव, शहर महिला अध्यक्षा सुनीता अग्रवाल, युवक अध्यक्ष हरिश कोत्तावार, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सुलेमान अली, शहर आदिवासी सेलचे अध्यक्ष अरविंद मडावी, सोशल मिडिया अध्यक्ष सी. रेमन्ड आदी उपस्थित होते.