गृहपाठ न केल्याने चंद्रपुरात केजी २ च्या विद्यार्थिनीला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:34 AM2018-01-24T10:34:05+5:302018-01-24T10:36:14+5:30

वर्गात फळ्यावर दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने केजी-२ च्या विद्यार्थिनीला केस पकडून जबर मारहाण केली. ही घटना चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल अकॅडमी स्कूल येथे मंगळवारी घडली.

KGB 2 student gangraped in Chandrapur due to non-homework | गृहपाठ न केल्याने चंद्रपुरात केजी २ च्या विद्यार्थिनीला जबर मारहाण

गृहपाठ न केल्याने चंद्रपुरात केजी २ च्या विद्यार्थिनीला जबर मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देव्हायरल व्हिडिओने खळबळ चंद्रपुरातील माऊंट कार्मेलच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्गात फळ्यावर दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने केजी-२ च्या विद्यार्थिनीला केस पकडून जबर मारहाण केली. ही घटना चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल अकॅडमी स्कूल येथे मंगळवारी घडली. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे.
मुलांना शाळेची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण द्यावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र, माऊंट कार्मेेल अकॅडमी येथील शिक्षिका मल्लिका सरकार यांनी केजी-२ मधील तीन ते चार वर्र्षांच्या एका मुलीला वर्गात फळ्यावर दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून वर्गातच केस पकडून जबर मारहाण केली. शिवाय, डोक्यावरील केस उपटले. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी गेली. आईचे लक्ष मुलीच्या केसांकडे गेले. विचारपूस केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला सदर प्रकरणाची माहिती दिली. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला बोलावून प्रकरणाची चौकशी केली असता मारहाण केली नाही, असा दावा तिने केला. त्यामुळे पालकांनी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज दाखविण्याची मागणी केली. फुटेज बघितले असता, आई-वडील थक्कच झाले. गृहपाठ पूर्ण न केल्याच्या छोट्याशा कारणामुळे मुलीला समजाविण्याचे सोडून केस उपटण्यापर्यंत मारहाण करणे, शासनाच्या नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे पीडित मुलीची आई मीनाक्षी नितीन सरकार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी शिक्षिका मल्लिका सरकार हिच्यावर कलम ३२३ नुसार अदखल पात्र गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पालक वर्गाकडून शिक्षिकेविषयी रोष व्यक्त केला जात आहे. त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे.
मुलांना शाळेची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण द्यावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र, माऊंट कार्मेेल अकॅडमी येथील शिक्षिका मल्लिका सरकार यांनी केजी-२ मधील तीन ते चार वर्र्षांच्या एका मुलीला वर्गात फळ्यावर दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून वर्गातच केस पकडून जबर मारहाण केली. शिवाय, डोक्यावरील केस उपटले. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी गेली. आईचे लक्ष मुलीच्या केसांकडे गेले. विचारपूस केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला सदर प्रकरणाची माहिती दिली. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला बोलावून प्रकरणाची चौकशी केली असता मारहाण केली नाही, असा दावा तिने केला. त्यामुळे पालकांनी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज दाखविण्याची मागणी केली. फुटेज बघितले असता, आई-वडील थक्कच झाले. गृहपाठ पूर्ण न केल्याच्या छोट्याशा कारणामुळे मुलीला समजाविण्याचे सोडून केस उपटण्यापर्यंत मारहाण करणे, शासनाच्या नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे पीडित मुलीची आई मीनाक्षी नितीन सरकार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी शिक्षिका मल्लिका सरकार हिच्यावर कलम ३२३ नुसार अदखल पात्र गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पालक वर्गाकडून शिक्षिकेविषयी रोष व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांना मारहाण करु नये, असे शिक्षिकांना सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थिनीला मारहाण करण्याची घटना घडली. त्यामुळे दोषी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.
- सिस्टर नित्या, मुख्याध्यापिका, माऊंट कार्मेल अकॅडमी, चंद्रपूर
 

Web Title: KGB 2 student gangraped in Chandrapur due to non-homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.