चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर होणार खरीप लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:25+5:302021-06-05T04:21:25+5:30

भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ ...

Kharif planting will be done on 4 lakh 82 thousand 88 hectares | चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर होणार खरीप लागवड

चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर होणार खरीप लागवड

Next

भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान पुणे वेधशाळेनेही विदर्भात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकºयांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात चार दिवसांपासून दररोज सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्रीचे तापमानही आता कमालीचे खाली घसरले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी दिली. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

असे आहे खरिपाचे नियोजन (हेक्टर)

भात- १ लाख ८५ हजार

सोयाबीन- ५७ हजार २००

कापूस- १ लाख ८८ हजार

तूर- ४० हजार

इतर पिके- १२ हजार

बीटी कपाशीची नऊ लाख ८६ हजार पॉकीटे

जिल्ह्यात यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार आहे. यासाठी कृषी विभागाने बीटी कपाशीच्या नऊ लाख ८६ हजार पाकिटांची मागणी कृषी संचालकांकडे नोंदविली आहे.

याशिवाय भात २ हजार ८०० क्विंटल, तूर २ हजार ८०० क्विंटल, सोयाबीन ३१ हजार ४४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यासाठी मागविण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकरी पेरणीपूर्व कामांसाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Kharif planting will be done on 4 lakh 82 thousand 88 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.